28 April 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे - शिवसेना

Shivsena, Saamana Editorial, Rajasthan Ashok Gehlot, Sachin Pilot

मुंबई, १२ ऑगस्ट : सामना अग्रलेखातून आज भाजपच्या ऑपरेशन कमळचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. राजस्थानात फसलेलं ऑपरेशन कमळ कसं भाजपच्याच अंगलट आलं याबद्दल सामनातून आज लिहिण्यात आलं आहे. ही राजकिय विकृती असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्रातही पहाटेची ऑपरेशन फसली. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भाजपच्या भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. अशी बोचरी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच थोडे थांबा, आणि पुढे जा… वळणावर धोका आहे असा सबूरीचा सल्लाही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

”शोले’ चित्रपटातील गब्बर सिंगप्रमाणे ऑपरेशन कमळची दहशत निर्माण केलीच होती. ‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला’ असं म्हणत शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. तसेच काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपाने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“काँग्रेसने राजस्थानमधील सरकार वाचविण्यात यश मिळवले आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. काँग्रेस हितासाठी आपण यापुढेही काम करत राहू, असे पायलट यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे व मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे सरकार चालविण्यासाठी स्पष्ट बहुमत आहे. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

 

News English Summary: Today’s headline of the match has taken the news of BJP’s Operation Kamal. Today’s match has written about how the BJP came to grips with Operation Kamal, which failed in Rajasthan. The match is said to be a political perversion.

News English Title: Shivsena Saamana Editorial On Rajasthan Ashok Gehlot Sachin Pilot News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x