1 May 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे | फडणवीसांचा टोला

BJP Devendra Fadanvis, Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray, Coronavirus, Marathi News ABP Maza

मुंबई, ११ सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारला आता असं वाटतंय की करोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचं आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील ५० टक्के क्षमता जरी करोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील असंही ते म्हणाले आहेत.

“या सरकारला आता करोना नाही कंगनाशी लढायचं आहे असं वाटतंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यांना कोणती चौकशी करायची आहे ते करु शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे. पण कुठेतरी गांभीर्याने करोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करु वैगेरे सुर आहे त्यापेक्षा जास्त करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यातील ५० टक्के क्षमता तरी करोनाशी लढण्यात वापरा, कदाचित लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल”.

पुढे त्यांनी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांना देखील प्रतिउउतर दिलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मनीष भंगाळे प्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला नासून १२ तासांत खडसेंना क्लीन चीट मिळाली. खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. खडसेंबद्दल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सर्व माहित असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, त्याचबरोबर अभिनेत्री कंगना राणौतविषयी देखील त्यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले एकनाथ खडसे
मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.

 

News English Summary: The Maharashtra government now feels that the battle with Karona is over and now it wants to fight Kangana, said Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Assembly and former Chief Minister. He made the remarks while talking to the media. He also said that even if 50 per cent of the capacity used to fight Kangana was used to fight Karona, people’s lives would be saved.

News English Title: BJP Devendra Fadanvis Kangana Ranaut Maharashtra Government CM Uddhav Thackeray Coronavirus Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x