29 April 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

वडिलांना मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा | त्या अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

Daughter of Ex Navy officer, beaten Shiv Sena workers, demands President rule, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणानंतर अधिकाऱ्याच्या मुलीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली आहे.

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या मुलाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप आहे. मदन शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. या मारहाण प्रकरणावरुन भाजपाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे.

शीला यांनी पोलीस घरी आले आणि त्यांनी वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी FRI नोंदवला आहे. राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असं देखील शीला यांनी म्हटलं आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 65 वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

 

News English Summary: My father received threats for forwarding a message. A no. of ppl from Shiv Sena attacked him.Later,police came to our residence & insisted on taking my father with them. We’ve registered FIR. Sheela Sharma,daughter of former Navy officer who was attacked in Mumbai.

News English Title: Daughter of Ex Navy officer beaten Shiv Sena workers demands President rule Maharashtra Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x