3 May 2024 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे - पंतप्रधान

Prime Minister Narendra Modi, Address To Nation, Coronavirus, Corona vaccine

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर : देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. मोदी यांनी देशातील करोना रुग्णसंख्या व अमेरिका, ब्राझील या देशातील परिस्थितीविषयी तुलनात्मक माहिती दिली. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लोकांकडून दुर्लक्ष होत असलेल्या एका गोष्टीवर चिंता व्यक्त केली.

कोरोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या सगळ्यात कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही जण मास्क न घालता फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत आहे.

कोरोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.

 

News English Summary: In his seventh address to the nation since the coronavirus outbreak, Prime Minister Narendra Modi Tuesday said the lockdown might have been lifted in the country but the “virus is still out there”. “In this festive season, markets are bright again but we need to remember that the lockdown might have ended but Covid-19 still persists. With efforts of every Indian over last 7-8 months, India is in a stable situation we must not let it deteriorate,” PM Modi said.

News English Title: Prime Minister Narendra Modi Address To Nation People Of India Coronavirus Corona vaccine News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x