5 May 2024 12:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर

Marathi Movie, Bahirji Naik, A detective of Chhtrapati Shivaji Maharaj

मुंबई, २६ ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. त्यामुळे त्यांच्या एका एका मावळ्याच चरित्र आणि मोहिमा या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. त्यामुळे आता सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा पडद्यावर अनुभवला जातो त्यावेळी प्रेक्षकांसाठी तो रोमांच उभे करणारा अनुभव असतो. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अशा उद्धवलेल्या समस्यांचा मागोवा घेताना शूर मावळ्यांचा इतिहास उलगडत जातो आणि या दरम्यान इतिहास आपल्याला अशाच एका अज्ञात यशस्वी शिलेदाराचे नाव समोर आणतो. अर्थात या धाडसी शिलेदाराचे नाव बरेचजण ऐकून असतील, पण त्यांचे कर्तृत्व मात्र अजूनही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आढळते. हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’. अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

आई जगदंबेच्या शुभाशीर्वादाने सादर आहे ‘बहिर्जी’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर … 🚩 ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा … या चित्रपटात दिसणार शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेतील धाडसी शिलेदाराची गाथा… ‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत . नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला रुपेरी पडद्यावर आता अनुभवता येणार आहे . #Bahirji Production House : #KaakMaayEntertainment Producer : #MandakiniKishorKakade Writer : #KiranPrakashMane Associate Producer : #Maheshkole Presented By : #MaheshKole, #PankajWadkar, #KunalKshirsagar PR & Marketing : #FreshMintMedia सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक आणि फॉलो करा काक माय एंटरटेनमेंट… #Marathi #MarathiFilm #MarathiMovie #TitlePoster #Maharashtra #Swarajya #MiMarathi #Maharashtra_ig #Marathi_ig

A post shared by Kaak Maay Entertainment (@kaakmaayent) on

नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला निर्माती मंदाकिनी किशोर काकडे सर्व सिने रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. लेखक किरण माने यांनी या चित्रपटाकरीता लेखनाची धुरा सांभाळली असून ‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती मंदाकिनी किशोर काकडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक पोस्टर प्रदर्शित झाले असून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून इतिहासामध्ये बहिर्जीना दिली गेलेली उपाधी लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहे.

 

News English Summary: The multi-faceted art creator and filmmaker Mandakini Kishor Kakade is all set to bring the saga of a brave, courageous warrior Bahirji Naik on the big screen. Bahirji Naik was an Indian spy and military commander in the army of Chhatrapati Shivaji Maharaj during a time when the Maratha Empire and Mughal Empire were at war. An official announcement about the launch of this film has been made by the makers of the film on their social networking page, by displaying first looks poster from the film.

News English Title: Marathi Movie Bahirji Naik a detective of Chhtrapati Shivaji Maharaj News updates.

हॅशटॅग्स

#MarathiMovie(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x