27 April 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

ठाण्यात भाजपमध्ये गटबाजी वाढली | महत्वाच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

BJP, state secretary Dayanand Chorghe, resigned

भिवंडी, 8 नोव्हेंबर : निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान गटबाजीला कंटाळून भाजपच्या महत्वाच्या नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील गटबाजीला कंटाळून अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.

मात्र प्रदेश सचिवाच्याराजीनाम्यामुळे जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसण्याला अनेक कारणं आहेत. कारण दयानंद चोरघे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठे प्रयत्न करून अनेक गाव तालुक्यामध्ये भाजपच्या शाखा उघडल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपचे खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी त्यांचं जिल्ह्यात मोठं योगदान आहे. आता त्यांनीच राजीनामा दिल्याने भारतीय जनता पक्षाची राजकीय कोंडी होणार हे निश्चित मानलं जातं आहे.

मात्र दयानंद चोरघे आगामी काळात इतर कोणत्या पक्षात गेल्यास भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी त्या पक्षाच्या गळाला लागतील आणि त्यामुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं मोठं राजकीय नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.

 

News English Summary: In Thane district, which is important in connection with the elections, factionalism has erupted in the Bharatiya Janata Party. Meanwhile, the resignation of a key BJP leader, fed up with factionalism, is likely to add to the BJP’s headaches. Fed up with factionalism in the district, BJP’s state secretary Dayanand Chorghe has tendered his resignation directly to state president Chandrakant Patil.

News English Title: BJP state secretary Dayanand Chorghe resigned from the BJP party News Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x