27 April 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मराठवाडा-विदर्भात अजित पवारांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे

Budget Session, Former MP Nilesh Rane, Ajit Pawar

मुंबई, ०२ मार्च: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला होता.

या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. १२ आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध?, असं टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर डागलं आहे.

काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू, असं अजित पवार म्हणाले होते.

 

News English Summary: Former MP Nilesh Rane has criticised Ajit Pawar. Ajit Pawar said yesterday that when 12 MLAs are announced, the term will be extended to the Statutory Development Corporations. This is an insult to the people of Marathwada-Vidarbha. If Ajit Pawar came to Marathwada-Vidarbha, he should be welcomed by throwing stones at his convoy. What is the relationship between 12 MLAs and Vikas Mahamandal ?, Tikastra Nilesh Rane has slammed Ajit Pawar.

News English Title: Maharashtra Budget Session Former MP Nilesh Rane criticised Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x