3 May 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

फडणवीस सध्या मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ झाल्याने ते चुकीची पावलं टाकत आहेत - माजी पोलीस आयुक्त

IPS Julio Ribeiro

मुंबई, २४ एप्रिल: राज्यात एकीकडे कोरोनाने धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. राज्यातील या सर्व विषयांवर पण प्रामुख्याने कोरोना संकटात विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळवाल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रीपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी ‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत त्यांना सुनावले आहे.

ज्युलिओ रिबेरोंनी फडणवीसांना कायदा दाखवला;
ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदा दाखवला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवड्याच्या प्रकरणात ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले होते. खरंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोरोना संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा एक स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.

मात्र, ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला होता. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या, योग्य नव्हत्या. यावेळी ते असंही म्हणाले की, फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला होता.

सध्या भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जाताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आतादेखील भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. त्यामुळे रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असा इशाराही रिबेरो यांनी दिला.

 

News English Summary: Devendra Fadnavis was a good Chief Minister. But now he is in a hurry for the Chief Minister’s post and he is taking wrong steps. Former Chief Minister Devendra Fadnavis, who is now the Leader of the Opposition in the Assembly, should not violate the law enacted by him during his tenure as Home Minister, said Julio Ribeiro. Ribeiro has written an article in The Indian Express. In this, he has shown the law and told them.

News English Title: Devendra Fadnavis is taking unnecessary risks to become CM again said former Mumbai police commissioner Julio Ribeiro news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x