29 April 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

शेती विषय | मोठ्या कमाईसाठी सरकारी रोपवाटिका योजना २०२१ | ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज

Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Yojana 2021

मुंबई, १३ जून | रोपवाटिका योजना २०२१ संदर्भातील माहिती. पंचायत समिती कृषी विभाग योजना सतत चालू असतात, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील बातमी दिनांक ९ जून २०२१ च्या दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे पेजला खाली स्क्रोल करून तो pdf अर्ज डाउनलोड करून घ्या.

बातमीसाठी येथे क्लीक करा:

रोपवाटिका योजना pdf स्वरूपातील अर्ज उपलब्ध, डाउनलोड करू शकता:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा लागतो तो कसा डाउनलोड करावा आणि या योजनेसंदर्भातील इतर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. या लेखात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेच pdf स्वरूपातील अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता व तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे शेवटच्या तारखेच्या आत सादर करू शकता.

अर्ज येथे क्लिक करून डाउनलोड करा:

रोपवाटिका व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल, योजनेचा लाभ घ्या:
शेतकरी बंधुंनो भाजीपाला पिकास खूप मोठा वाव आहे. प्रामुख्याने तुम्ही जर मिरची या पिकाचा विचार केला तर आज खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरची या पिकाची लागवड करतांना दिसत आहे त्यामुळे रोपवाटिका या व्यवसायास चांगले दिवस येत आहेत. रोपवाटिका व्यवसाय करून अनेक शेतकरी लाखो रुपये कमवीत आहेत.

रोपवाटिका व्यवसाय करेल बेरोजगारीवर मात.
मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि बेरोजगारी हि दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. शेती व्यवसायामध्ये आज रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतांना दिसत आहेत. रोपवाटिका उभारण्यास अनेक शेतकरी उत्सुक असतात परंतु केवळ निधी अभावी त्यांना हा व्यवसाय करता येत नाही. ज्या शेतकरी बांधवाना रोपवाटिका व्यवसाय करायचा आहे त्यांनी या रोपवाटिका योजना २०२१ चा लाभ घ्यावा आणि त्याचा ऑफलाईन अर्ज कृषी अधिकारी यांना सादर करावा. अहिल्यादेवी रोपवाटिका योजना संदर्भातील मार्गदर्शिका pdf डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

मार्गदर्शिका pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा:

ऑनलाईन अर्जासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: येथे क्लिक करा

रोपवाटिका योजनेसाठी लाभार्थी निवड:
* अर्जदाराकडे स्वतःच्या मालीकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
* रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
* रोपवाटिका योजना २०२१ लाभार्थी निवडीचे निकष

* या योजनेसाठी महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील.
* महिला गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य राहील.
* भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.

 

News Title: Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Yojana for farmers Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x