4 May 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

जगातील सर्वात विषारी विंचू | तब्बल 75 कोटी रुपयांना विकतं या विंचूचं विष | पण का? - वाचा माहिती

Cuba blue scorpion in Marathi

क्युबा, ०७ जुलै | जगाच्या नकाशावर निरनिराळ्या प्रकारचे विषारी तसेच अत्यंत घातक प्राणी आहेत. यातील अनेक प्राण्याबद्दल आपल्याला सर्वसाधारण माहिती देखील नसते. त्यात विषारी प्राणी म्हटलं की सर्वात प्रथम आपल्या डोळ्या समोर सर्प म्हणजे साप येतो. परंतु, सापासोबतच विंचू हा सुद्धा असाच एक विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. क्युबा येथील विंचवाच्या विषाला तर मोठी मागणी आहे. त्याचे विष तब्बल 75 कोटी रुपयांना विकते.

क्युबा येथे एक विशिष्ट प्रकारचा विंचू सापडतो. हा विंचू निळ्या रंगाचा असून त्याच्या विषाला मोठी किंमत आहे. या विंचवाचे विष तब्बल 75 रुपये प्रतिलिटर दराने विकते. मिळालेल्या माहितीनुसार या निळ्या रंगाच्या विंचवाच्या विषापासून एक औषधी तयार केली जाते. या औषधीचे नाव ‘Vidatox’ असून त्याचा उपयोग कर्करोगावर उपचार करण्यासाठी होतो. या विंचवाचे विष कर्करोगाला मुळापासून नष्ट करतात असे म्हटले जाते. क्युबामध्ये या विंचवाच्या विषाला चमत्कारी विष म्हटलं जातं.

जगातील अत्यंत महागडे विष:
क्युबा येथे आढळणाऱ्या या निळ्या विंचवाच्या विषाला मोठी मागणी आहे. तसेच हे विष जगातील सर्वात महाग विष असून ते 75 कोटी रुपये प्रतिलिटर या दराने विकते. त्यानंतर किंग कोब्रा जातीच्या सापाचे विष हे 30.3 कोटी रुपये प्रतिलिटर दराने विकते. मिळालेल्या माहितीनुसार क्युबा येथे आढळणाऱ्या निळ्या विंचवाचे विष थायलंड येथील किंग कोब्राच्या विषापेक्षाही महाग आहे.

पेनकिलर म्हणून उपयोग:
इस्त्रायलच्या तेल अविव विद्यापीठचे प्रोफेसर मायकल गुरेवटिज यांनी दिलेल्या माहितीनुसार क्युबातील विंचवाच्या विषाचा उपयोग आरोग्यविषयक संशोधन आणि उपचारासाठी केला जातो. तसेच या विंचवाच्या विषामध्ये पेनकीलर म्हणून काम करणारे तत्व आढळतात. त्याबरोबरच क्युबातील विंचवाचे विष शरीरातील कॅन्सर थोपवण्यासाठी वापरले जाते.

दरम्यान, विंचवाचे विष फक्त कॅन्सरवर उपचारासाठीच नव्हे तर अन्य अनेक आजारांवर गुणकारी असल्याचा दावा केला जातो. मात्र, अन्य कोणत्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Cuba blue scorpion poison is worlds facts about animals in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Special(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x