29 April 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Afghani Hazara Community Girls | अफगाणी हजारा समाजाच्या मुली दहशतीखाली | तालिबान्यांकडून जबरदस्तीने लग्न

Taliban in Afghanistan

काबुल, १९ ऑगस्ट | तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांचं महिलांविरोधी धोरण समोर आलंय. काबूलमधील शर-ए-नॉ येथील ब्यूटी सलूनबाहेरचे महिलांचे स्प्रे-पेंट केलेले फोटो हटवण्यात आले आहेत. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका मीडिया आउटलेटने ट्विट केलेल्या फोटोमध्ये तालिबानचा एक कार्यकर्ता रायफलसह सलूनच्या भिंतींवर असलेले फोटो रंगवून मिटवताना दिसतोय. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा मिळवला. त्यानंतर तालिबान्यांनी भिंतींवर रंगवलेली महिलांची अनेक छायाचित्रे रंगवून हटवल्याचे फोटो समोर आले आहेत.

8 ऑगस्ट 1998 रोजी तालिबानच्या लढाकुंनी अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफमध्ये दाखल होताच गोंधळ घाल्याण्यास सुरुवात केली. जो जीथे सामडेल त्याला गोळ्या घातल्या. अनेक दिवस तिथे हजारा समाजातील हजारो लोकांना निवडून ठार मारले. तालिबान्यांनी मृतदेह दफन करण्यासही परवानगी दिली नाही. तेव्हा बल्खचे तालिबानी गव्हर्नर मुल्ला मन्नान नियाजी ने एका भाषणात म्हटले होते, “उझ्बेकी लोकांना उझ्बेकिस्तानला निघून जावे, ताजिक लोक ताजिकिस्तानला निघून जा आणि हजारा यांनी एकतर मुसलमान बना किंवा स्मशानात जा.

आता 23 वर्षांनंतर तालिबानचे राज्य पुन्हा एकदा अफगाणिस्तानात परतले आहे. यामुळे हजारा लोक भीतीच्या छायेत आहे. अनेक ठिकाणी तालिबान लढाकू त्यांच्या मुलींशी जबरदस्तीने लग्न (Afghanistan Hazara community girls) करत आहे. असे वृत्त आले आहेत. परंतु, अद्याप याला दुजोरा देण्यात आला नाही. तर काही भागात खून झाल्याचेही वृत्त आहे. हजारा हा शिया मुस्लिमांचा एक समूह आहे. ज्यांना अनेक दशकांपासून छळले जात आहे. हे शिया मुस्लिम, अफगाण लोकसंख्येच्या सुमारे 10%, जगातील सर्वात जास्त छळले गेलेले अल्पसंख्यांक आहेत. कट्टरपंथी सुन्नी त्यांना मुस्लिम मानत नाहीत.

अफगाणी हजारा समाजाच्या मुली दहशतीखाली,  तालिबान्यांकडून जबरदस्तीने लग्न (Taliban in Afghanistan Hazara Muslim community sent their young daughters to Kabul)

हजारा नेत्याच्या मूर्तीचे डोके कापून पसरवली दहशत:
काबुलमधील तालिबान जागतिक माध्यमांना “शांतता आणि सुरक्षिततेचे” आश्वासन देत होते, त्याचवेळी बामियानमधून हजारा नेता अब्दुल अली मजारी यांचा पुतळा पाडल्याच्या बातम्या आल्या. 1995 मध्ये तालिबान्यांनी मजारीची हत्या केली होती. अफगाणिस्तानमधील हजारा समाज हा अनेक दशकांपासून हिंसाचाराचा बळी ठरला आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. सलीम जावेद पेशाने डॉक्टर आहेत आणि ते स्वीडनमध्ये राहतात आणि बराच काळ ते हजारा यांच्या समस्यांवर लिहित आहे. त्यांनी मजारी यांची मूर्ती पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉ..जावेद यासंदर्भात म्हणतात, ‘मजारीच्या मूर्तीचे शिर कापले गेले आणि जमिनीवर ठेवण्यात आले. हजारा लोकांनीही याचा निषेध केला.

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने मंगळवारी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही तासांतच अब्दुल मजारी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तालिबानच्या अधिपत्याखाली सर्व सुरक्षित आहेत आणि प्रत्येकाला त्यांचे हक्क दिले जातील असा दावा जबीउल्ला मुजाहिद यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Taliban in Afghanistan Hazara Muslim community sent their young daughters to Kabul.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x