26 April 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? | पगडी, हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी

Taliban in Afghanistan

काबुल, २५ ऑगस्ट | अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा काळ सुरु झाला आहे. तालिबानचे सरकार सत्तेवर आलेले नाही.अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडत नाही तोपर्यंत सरकार स्थापन करणार नाही, असे तालिबाननं जाहीर केल आहे. दुसरीकडे तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांनी पगडी आणि हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे.

अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? | पगडी, हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी – Afghanistan people in the shop to buy turbans and hijabs news updates :

तालिबाननं सत्ता हातात घेतली. जे लोक सरकारी नोकरीत होते त्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले. महिलांना पुन्हा काम करण्यावर अचानक बंदी आणली आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रापुरतच महिलांना काम करण्याची मुभा दिली आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोक नेमकी कशाची खरेदी करतायत असा प्रश्न पडू शकतो.आश्चर्य म्हणजे अफगाण लोक दोन वस्तुंची जोरदार खरेदी करत आहेत.

हिजाब आणि पगडीची खरेदी का?
तालिबानने सत्ता काबीज केली तेव्हापासून लोकांचा कल वस्तू साठवण्याकडे आहे. त्यात अफगाण लोक हिजाब आणि पगडींची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दुकानदारांनी सांगितलं. १९९६ ते २००१ च्या दरम्यान तालिबानचं सरकार अफगाणिस्तान मध्ये होतं. तेव्हा तालिबान सरकारनं पुरुषांना पगडी आणि महिलांना हिजाब अनिवार्य केला होता.

त्यामुळेच आताही हिजाब आणि पगडी पुन्हा अनिवार्य केली जाऊ शकते, अशी भीती लोकांना वाटत आहे. त्यामुळेच पगडी आणि हिजाब खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत, असे पझवोक ह्या स्थानिक वृत्तसंस्थेच्या पाहणीत उघड झाले आहे. हिजाब आणि पगडी खरेदीत चौपट वाढ झाल्याचे अहवालामध्ये म्हटल आहे.

हिजाब, पगडी, बुरख्यांच्या किमती वाढल्या: (Afghanistan peoples in the shop to buy turbans and hijabs)

हिजाब-पगडीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आधी एका हिजाबसाठी १हजार अफगाणी(चलन) मोजावे लागत होते. आता त्याची किंमत दीड हजाराकडे आहे. तर बुरख्यांची किंमत १० टक्क्यानं वाढल्याचं CNN च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एका अफगाण महिलेनं सांगितलं की, घरात चार महिला आहेत आणि दोनच बुरखे आहेत. तेच शेअर केले जातात. फारच अती गरज पडली तर पांघरायच्या चादरीचा बुरखा म्हणून वापर केला जातो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Afghanistan people in the shop to buy turbans and hijabs news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x