29 April 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या
x

TATA Sons Job Opportunities | TATA ग्रुपमध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल 4564 रिक्त जागा

TATA Sons Job Opportunities

मुंबई, ०५ ऑक्टोबर | आताच्या घडीला TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच नवीन क्षेत्रात उडी घेण्यासंदर्भात TATA ग्रुप योजना (TATA Sons Job Opportunities) आखत आहे.

TATA Sons Job Opportunities. Today, TATA Group is one of the most successful industries in the country, with its distinct identity in various sectors such as automobile, aircraft, insurance, steel, chemical. The TATA Group is also planning to jump into new areas :

कोरोना संकटातून हळूहळू आता देश सावरत असून, उद्योगांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात होत आहे. या कोरोना संकटातही अनेक उद्योगांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये TATA ग्रुपमधील अनेक कंपन्या आघाडीवर होत्या, असे सांगितले जात आहे. सर्वांत विश्वासार्ह मानल्या गेलेल्या TATA ग्रुपमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्यांमध्ये सुमारे ४ हजार ५६४ जागा रिक्त असून, यासाठी अर्ज मागवले जात आहे. गेल्या ३० दिवसांपासून २१८८ तर गेल्या ७ दिवसांपासून ६१७ ओपन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. TATA ग्रुपमध्ये आताच्या घडीला सुमारे ७.५ लाख नोकरदार देश आणि विदेशात काम करतात. TATA ग्रुपमधील बी-७३७ एअरलाइनमध्ये पायलटपासून ते एन्ट्री लेवल कस्टमर सुपरवायझरपर्यंत विविध पदांसाठी अनुभवी, स्किल्स आणि शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय TATA ग्रुपमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), TATA मोटर्स, इंडियन हॉटेल्स, TATA कम्युनिकेशन, टायटन कंपनी, TATA कॅपिटल, TATA एआयए लाइफ, जॅग्वार लँड रोव्हर, TATA स्काय, TATA क्लिक, TATA टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांमध्यो नोकरीसाठी अर्ज करू शकता. TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी https://www.tata.com/careers/jobs/joblisting या संकेतस्थळावर भेट देऊ शकता, असे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपमधील कंपन्यातील कर्मचाऱ्यांसाठी समान संधी उपलब्ध करते, असे सांगितले जात आहे. देखील टाटा स्टीलला गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विश्वास मिळाला. दुसरीकडे, संकटकाळातही TATA ग्रुपमधील एका कंपनीने घसघशीत बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सलग तिसऱ्या वर्षी बोनस जाहीर करणारी कंपनी म्हणजे Tata Motors. कोरोना संकटकाळातही Tata मोटर्स कंपनीने कामगारांना यंदा दिवाळीसाठी किमान ३८ हजार २०० रुपये ते कमाल ५० हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार रुपयांनी बोनस जास्त आहे. या निर्णयाचा फायदा सहा हजार कामगारांना होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: TATA Sons Job Opportunities in different sectors of companies.

हॅशटॅग्स

#TATA(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x