28 April 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
x

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | काय आहेत आजचे नवे दर

Petrol Diesel Price

मुंबई, 21 ऑक्टोबर | सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.

Petrol Diesel Price. Petrol and diesel prices have been hiked by 35 paise per liter. These rates will be applicable throughout the day today. According to the rates announced by petroleum companies on Thursday, the price of petrol in Mumbai is Rs 112.44 per liter. A liter of diesel costs Rs 103.26 :

आज भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 103.26 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.54 आणि 96.27 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुम्ही SMS’च्या मदतीने रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज पहाटे 6 वाजता बदलत असतात. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार RSP सोबत तुमच्या शहराचा CODE नंबर टाइप करून 9224992249 या क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड निरनिराळा असतो. BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice असं टाईप करून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊ शकतात..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title: Petrol Diesel Price as on 21 October 2021 checkout updated rates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x