महत्वाच्या बातम्या
-
IND Vs NZ : न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे आव्हान
विजय शंकरचं अर्धशतक ५ धावांनी, तर रायुडूचं शतक १० धावांनी हुकलं आहे. रायुडूनं ९० धावांच्या खेळीला ८ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला. तर शेवटी हार्दिक पंड्याने २२ चेंडूत २चौकार आणि ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे लक्ष देण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
साडेचार वर्ष स्वतःच्या 'मन की बात,' पण आता निवडणुकीआधी ‘भारत के मन की बात’
२०१४ मध्ये भारतात भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासून संपूर्ण देशाला केवळ तब्बल साडेचार वर्ष स्वतःच्या ‘मन की बात’ ऐकवणारे मोदी आता लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ‘भारत के मन की बात’ मोहीम सुरु करणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर मोठी भिंत उभारण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या विचारापर्यंत पोहोचलो आहोत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संकेत दिल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वेवरील तब्बल अकरा तासांचा मेगाब्लॉक संपला
लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम तसेच बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या मेगा ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एक सुद्धा लोकल धावली नाही. हा ब्लॉक आता पूर्ण झाला असून पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आता पश्चिम रेल्वेवरील मेल आणि एक्स्प्रेसची वाहतूक सुद्धा पूर्णपणे सुरळीत झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पहिली चर्चगेट-विरार लोकल रवाना झाली.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: सीमांचल एक्सप्रेसचे नऊ डबे घसरले; सहा ठार
सीमांचल एक्सप्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बिहारमधील सहदाई बुजुर्ग येथे हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी डॉक्टरांची टीम रवाना झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकदेखील जारी केले आहेत. दरम्यान, मृत प्रवाशांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय
तब्बल ४० बँकांचे ४६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा डोक्यावर असलेल्या अनिल अंबानी यांच्या ‘आरकॉम’ अर्थात रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने अखेर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विषयाला अनुसरून कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे कायदेशीर पूर्तता करण्यासाठी धाव घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; असं एका ओळीत उत्तर देत अण्णांची मोदींकडून हेटाळणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणे: प्रसिद्ध अमृततुल्यवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
मागील अनेक महिन्यात पुण्यात प्रचंड प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या आणि शहरातील काॅर्पाेरेट लुट असणाऱ्या अमृततुल्यावर राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. एकही परवाना न घेता तसेच विना नाेंदणी चहा विक्री करणाऱ्यांच्या विराेधात राज्य एफडीएकडून धडक कारवाई करण्याची जोरदार माेहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, या धडक कारवाईत बुधवार पेठेतील प्रसिद्ध येवले अमृततुल्य तसेच साईबा अमृततुल्यच्या विविध शाखांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा #आखरी-जुमला-बजेट, समाज माध्यमांवर ट्रेंडिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्गीय, यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे हे #AakhriJumlaBudget असल्याची टीका विरोधकांसह नेटीझन्सनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#बजेट-२०१९: ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर नाही
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यात शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, आता ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ, अर्थमंत्री म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार?
बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करत आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
केवळ निवडणूकपूर्व घोषणांचा अर्थसंकल्प ठरण्याची शक्यता? अनेक अर्थतज्ज्ञांना शंका
बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने आज ते संसदेत लोकसभा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील.
6 वर्षांपूर्वी -
भाजपने घोषणेतून 'मोदी सरकार' शब्द हटवले? नवी घोषणा ‘अबकी बार ४०० के पार’?
भाजप’ने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ मधील घोषणेत बदल केल्याचे वृत्त आहे. २०१४ मधील ‘अबकी बार मोदी सरकार’ मधील ‘मोदी सरकार‘शब्द वगळून “अबकी बार ४०० के पार” अशी नवी घोषणा देण्याची योजना असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एनडीएने तब्बल ३३६ जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यावेळी एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय प्राप्त केला होता.
6 वर्षांपूर्वी -
इतिहास रचला! ४५ वर्षातील सर्वात भीषण बेरोजगारी मोदींच्या सत्ताकाळात: सरकारी अहवाल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार बेरोजगारीच्या वास्तवावरून तोंडघशी पडलं आहे. एवढंच नाही तरी मोदी सरकारने मागील ४५ वर्षातील बेरोजगारीचा विक्रम केल्याचे एका सरकारी अहवालातूनच सिद्ध झालं आहे. देशातील यंदाचा बेरोजगारीचा दर हा मागील ४५ वर्षातील सर्वाधिक असल्याचं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशातील २०१७-१८ चा बेरोजगारीचा दर हा तब्बल ६.१ टक्के इतका आहे. दरम्यान, सदर अहवालानुसार १९७२-७३ पासूनच्या जेव्हा देशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा पासून बेरोजगारीचा हा दर सध्या सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
एसबीआय'च्या लाखो ग्राहकांचा बँक खात्यासह महत्त्वाचा डेटा लीक
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय’च्या ग्राहकांची महत्त्वाची माहिती स्टोअर असणाऱ्या मुख्य सर्व्हरमधील हजारो ग्राहकांची अति महत्त्वाची माहिती लीक झाल्याचे वृत्त आहे. त्यात बँक बॅलेन्स, खाते क्रमांक अशा महत्वाच्या खासगी माहितीचा समावेश आहे. दरम्यान, सर्व्हरमधील डेटा हा कोणत्याही सुरक्षेविना असल्यामुळे हे घडल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल हे अत्यंत साधे व्यक्ती असून त्यांची देशाला व गोव्याला गरज: भाजप गोवा विधानसभा उपसभापती
गोव्याच्या कौटुंबिक दौऱ्यावर असताना सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल आजारीने त्रस्त असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, कालच्या या भेटीचे गोवा विधानसभेचे विद्यमान उपसभापती तसेच भाजप आमदार मायकल लोबो यांनी स्वागत केले. तसेच त्यांचे तोंडभरून कौतुक सुद्धा केल्याने भाजपाची राजकीय गोची झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी देशभरात दौरे करतील: गुलाम नबी आझाद
प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश निश्चित झाल्यावर आता त्यांना लवकरच काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. तसे अप्रत्यक्ष संकेतच काँग्रेसमधून देण्यात आले आहेत. तसेच त्यांना केवळ पूर्व उत्तर प्रदेशातील प्रचारापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरविण्यात येईल असे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणवर, मोदी सरकारची डोकेदुखी वाढली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: पर्रिकर म्हणाले, अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मोदींनी ‘खेळ’ केला: राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणावरुन धक्कादायक दावा केला आहे. राफेल करारात मनोहर पर्रिकरांचा कोणताही सहभाग नव्हता असे त्यांनीच मला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच केवळ उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण खेळ रचल्याचे सुद्धा मला पर्रिकरांनी सांगितल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
-
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL