कोरोना संकटात भारताला जागतिक बँकेकडून एक बिलियन डॉलरची मदत
नवी दिल्ली, १५ मे: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. जागतिक बँकेने भारताला एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती.
जागतिक बँकेचे हे एक अब्ज डॉलरचे (सुमारे ७६०० कोटी) पॅकेज देशातील कोरोना रुग्णांच्या चांगल्या तपासणीसाठी, कोविड रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच प्रयोगशाळेसाठी इमारत बांधण्यासाठी वापरले जाऊ शकते. जागतिक बँकेने यापूर्वी २५ विकसनशील देशांना पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
जागतिक बँकेनं मुख्यत: शहरी गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी मदत जाहीर केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न झाल्यानं लाखो मजूर त्यांच्या गावाकडे परतत असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी जागतिक बँकेनं सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे. सरकारच्या ४०० हून अधिक सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर्सची मदत
(Source: ANI) pic.twitter.com/8Aoo68eZ15
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) May 15, 2020
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. पण, लॉकडाउनमुळे थेट अर्थचक्रावरच परिणाम झाला असून, आर्थिक संकटानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सरकारच्या महसूलावर परिणाम झाला असून, राज्यांनही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपये जाहीर केले होते.
News English Summary: The World Bank has offered great relief to India in the wake of the Corona crisis. The World Bank has announced a 1 billion package for India. This is a social protection package. Earlier, the BRICS New Development Bank announced 1 billion dollar in emergency aid for the war with Corona.
News English Title: The World Bank has announced a 1 billion package for India to fight corona crisis News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा