महत्वाच्या बातम्या
-
उत्तर प्रदेशात भाजपला केवळ १८ जागा; मोदी-शहा जोडीला झटका बसणार: सर्वे
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यूपीत मोठा झटका बसण्याची शक्यता. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने यांनी एकत्रित केलेल्या जनमताच्या चाचणीतून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. त्यानुसार, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर राजकीय दृष्टया सर्वात महत्वाच्या असलेल्या युपी’त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांचा मित्र पक्षाला म्हणजे अपना दलला मिळून केवळ १८ जागा मिळतील असा निष्कर्ष बाहेर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रियांका गांधींवर पक्षात मोठी जवाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांची राष्ट्रीय काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियांका गांधींकडे युपीच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर युपी’च्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बलाढ्य अर्थशक्ती? भाजपकडून प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर बुक?
लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय पक्षांची सुद्धा धावपळ सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांची वेगळ्याच प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. कारण, काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीआधीच विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी अर्थकरणाच्या शक्तीवर देशातील जवळपास सर्वच खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर आधीच बुक केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तर...पंतप्रधानपदासाठी शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल
लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण कठीण होणार आहे. अशा राजकीय पेच निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं यांचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना जाहीर पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'च्या नावाने ५६ टक्के निधी फक्त जाहिरातबाजीवर
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’मागील वास्तव उघड झालं आहे. कारण केंद्र सरकारकडून तरतूद करण्यात आलेला एकूण निधी पैकी सर्वाधिक पैसा हा सरकारकडून केवळ जाहिरातबाजीवर उधळला जातो आहे. देशातील महिला-पुरुष जन्मदरात समतोल निर्माण करण्यासाठी आणि महिलांप्रति लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी ही योजना केंद्राने हाती घेतली होती. त्यासाठी मोदी सरकारने कोट्यवधी रुपयांची भली मोठी तरतूद सुद्धा केली. परंतु, तरतूद करण्यात आलेल्या एकूण ६४४ कोटी रुपयांपैकी तब्बल ५६ टक्के निधी हा मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्रकार गौरी लंकेश EVM हॅकिंगची पोलखोल करणार होत्या, त्याआधीच त्यांना ठार करण्यात आले
ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने आधीच देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता अजून काही दावे करण्यात आले आहेत. कारण परदेशी हॅकर सैयद शुजाने पुढे अजून काही दावे करताना म्हटले की, हैदराबाद स्थित भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला भेटायाला गेलेल्या माझ्या टीमच्या ११ मित्रांची सुद्धा हत्या करण्यात आली. ही संपूर्ण टीम भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करण्यासाठी गेली होती, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ; भारतासमोर केवळ १५८ धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वनडेमध्ये चमकदार कामगिरी करून दाखविल्यानंतर आता विराट कोहलीचा भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये सुद्धा फॉर्मात असल्याचे दिसते. कारण आजपासून ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध विजय संपादन करण्यासाठी विराट टीम सज्ज झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO व्हायरल: उत्तर पश्चिम जिल्हा निरीक्षकांकडून निरुपम यांची लोकसभा उमेदवारी फिक्सिंग?
उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
6 वर्षांपूर्वी -
मी ४३ वर्षाच्या मैत्रीत मोदींना कधीच चहा विकताना पाहिलं नाही: प्रवीण तोगडिया
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अनेक भाषणादरम्यान आपण चहा विक्री सुद्धा केल्याच्या दावा केला होता. परंतु, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी हे सर्व दावे खोडून काढले आहेत आणि मोदींना भूतकाळात कधीच चहा विकला नाही, असं सांगत मोदींना चपराक दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर माझी तब्बल ४३ वर्ष मैत्री होती. पण त्या कार्यकाळात त्यांना केव्हाही चहा विकताना पाहिलं नाही. केवळ आणि केवळ सामान्य लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीच हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आणि मोदींना तोंडघशी पाडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक - शिवसेनेचं 'जय उत्तर प्रदेश', यूपीत लढवणार लोकसभेच्या २५ जागा
दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सामील असलेली शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतात. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं तसेच अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेल्या यूपीत इतर स्थानिक मित्र पक्षांसह लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या कानावर आलं आहे. त्यासंबंधित लवकरच अधिकृत घोषणा शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: उ. पश्चिम मुंबई लोकसभा उमेदवार निश्चिती, कार्यकर्त्यांच्या माजी मंत्री सुरेश शेट्टींच्या समर्थनार्थ घोषणा
उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटकातील कारवारजवळ बोट बुडून १६ जणांचा मृत्यू
कर्नाटकामधील कारवारजवळ समुद्रात बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये एकूण चोवीस प्रवासी स्वार होते. दरम्यान, हे सर्व प्रवासी बोटीने देवदर्शनाला निघाले असता हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
NDA: वाजपेयींना जमलं ते मोदींना जमलं नाही! शेर अकेला नाही, ते केवळ मार्केटिंगसाठी; ४० हुन अधिक मित्रपक्ष
काँग्रेससह देशभरातील एकूण २० प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडवली खरी. तसेच केवळ माझ्या विरुद्ध देशातील सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत असा कांगावा मोदी जागोजागी करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विशेष रिपोर्ट- प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ही सेम असतं! सर्वकाही ठरवून?
आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेतील सर्व घडामोडींवर बारीक नजर टाकल्यास सर्वकाही २०१४ मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठरवून सुरु आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे याच २०१४ मधील राजकीय रणनीतीप्रमाणे भाजप आणि शिवसेनेने निवडणुका लढवल्या होत्या आणि प्रसार माध्यमांना एकप्रकारे स्वतःवर केंद्रित करून अप्रत्यक्षरीत्या गंडवले होते, असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
देशातील खऱ्या गंभीर घडामोडींपेक्षा तैमूरच्या डायपर'मधील घडामोडीत माध्यमांना रस का? सविस्तर
तसा दोष त्या गोंडस बाळाचा नाही किंवा त्याच्या आई-वडिलांचा, कारण प्रसार माध्यमांमधील जवाबदारीच हळहळू संपुष्टात येते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होते आहे. सिनेश्रुष्टी आणि करमणूक क्षेत्रातील बातम्या हा देखील प्रसार माध्यमांतील घटक आहे हे खरं असलं, तरी सुद्धा एखादा विचारात न घेण्यायोग्य मुद्याला राष्ट्रीय स्तरावरील दैनंदिन बातमी बनविणे हे कितपत योग्य आहे, हा सुद्धा प्रश्न येतो.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले, तरी घोषणा काही संपेना!
केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. परंतु, देशावरील एकूण कर्जाचा बोजा बघता भविष्यात सर्वकाही आर्थिक दृष्ट्या फारच कठीण आहे असंच म्हणण्याची वेळ आली आहे. त्यात, महसुली तोटा ही दुसरी मोठी आर्थिक अडचण सुद्धा डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. एखाद्या घोषणेची अंमलबजावणी म्हटल्यास सरकारी तिजोरीत पैसा असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु, सध्या अर्थमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ते सर्वच कठीण आहे असं म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मणिकर्णिका चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका, प्रकृती चिंताजनक
अभिनेत्री कंगणा राणावत हिचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त आहे. कमल जैन यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर सध्या मुंबईतील कोकीलाबेन इस्पितळात उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर मशीनवर ठेवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विहिंप'ची काँग्रेसला ऑफर
सलग ५ वर्षे एकपक्षीय असे बहुमताचे केंद्र सरकार चालवून सुद्धा भाजप’ला अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नावर मार्गी लावता आलेला नाही. भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संताप आणि संशय निर्माण करणारं वातावरण निर्माण झाल्याने या संघटना आता मंदिराबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडून शत्रुघ्न सिन्हांवर कारवाईचे संकेत, लवकरच ‘खामोश’ करणार
कोलकाता येथे विरोधकांच्या महारॅलीमध्ये शनिवारी अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी, खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत मोदींनाच आवाहन दिलं आणि स्वपक्षा विरोधात रणशिंग फुंकले होते. मागील अनेक वर्षांपासून सिन्हा स्वपक्षाच्या आणि विशेष करून मोदींच्या विरोधात रान पेटवत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई मॅरेथॉन: केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता
मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षातही केनिया तसेच इथियोपियाच्या धावपटूंनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने पहिला क्रमांक पटकावला. तर दुसरीकडे पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय खेळाडूंच्या गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने प्रथम तर सुधा सिंहने महिलांच्या गटात प्रथम स्थान मिळवलं आहे. पुरुषांमध्ये गोपी टी. ने द्वितीय क्रमांक तर करणसिंहने तिसरा क्रमांक मिळवला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL