13 December 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही: डॉ. डेव्हिड नबारो

Corona Crisis, Covid 19, Dr David Nabarro

नवी दिल्ली, ३ एप्रिल: जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर worldometers.info नं दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसनं आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.

अमेरिकेत २ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जर ३० एप्रिलपर्यंत सोशल डिस्टेंसिंगचं कठोर पालन न केल्यास अमेरिकेत कोरोना व्हायरसचा हाहाकार माजेल, इतकचं नाही तर २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल अशी भीती खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. जगात इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचं दिसून येतं. इटलीत कोरोनामुळे १३ हजारांहून जास्त लोकांचा जीव गेला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू येत्या काळात पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही. तसे कोणतेही पुरावे नाहीत. लोकांना हा विषाणू आहे हे गृहीत धरूनच आपले काम करावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळातही कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा शोध घेणे, त्यांना विलग करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, त्यांना अलगीकरणात पाठवणे हीच साखळी कायम ठेवावी लागेल, असे स्पष्ट मत जागतिक आरोग्य संघटनेचे कोविड १९ प्रतिबंधक विशेष दूत डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: Dr. David Nabarro said if the Corona virus infection was not prevented early, the situation could go away. It is possible to prevent the infection even when the infection is low. Currently, it cannot be said that the corona virus will be destroyed. Therefore, even in the coming days, the chain of detection of cornea infected patients, isolating them, finding people who have been in contact with them, testing them, sending them into isolation, will have to be maintained, ”he said.

 

News English Title: Story there is no evidence to suggest that the corona virus disease will disappear says Dr David Nabarro world corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x