15 December 2024 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोरोना लस येण्यासाठी २ वर्ष लागतील, कोरोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं - WHO

World Health Organization, David Nabarro, corona vaccine

नवी दिल्ली, ११ मे: कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४१ लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. ताज्या माहितीनुसार, देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४ हजार २९ इतकी आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी करोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकानं करोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. या मुलाखतीत बोलताना नाबारो यांनी भारतानं करोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं. “भारतीय नागरिक करोनाशी जुळवून घेत जगू शकतो. अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं करोनाला बाजूला ठेवता येऊ शकतं. देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविषयी शिक्षित करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे,” असं नाबारो म्हणाले.

 

News English Summary: The World Health Organization’s special envoy, David Nabarro, has estimated that it will take two years for the corona vaccine to arrive. Therefore, he has appealed to everyone to learn to live in harmony with Corona.

News English Title: World Health Organization’s special envoy David Nabarro has estimated that it will take two years for the corona vaccine to arrive News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x