14 December 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

My EPF Money | नोकरदारांसाठी EPF खात्यातून पैसे काढणं झालंय अधिक सोपं, फॉलो करावी लागेल 'ही' प्रोसेस - Marathi News

Highlights:

  • My EPF Money
  • अशावेळी काढता येतील पीएफचे पैसे :
  • ऑनलाइन पद्धतीने पीएफचे पैसे काढण्यासाठी पुढील कागदपत्रांची गरज भासेल :
  • UAN नंबरमुळे असे काढता येतील पैसे :
My EPF Money

My EPF Money | ईपीएफओ अंतर्गत अनेक सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. अशातच तुम्ही तुमचा पीएफ फंड अगदी सहजरीत्या काढू शकता. खास करून ज्या व्यक्तींना गरजेच्यावेळी पैशांची नितांत गरज असते अशा व्यक्ती त्यांच्या पीएफ खात्यातून अगदी सहजरीत्या पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा कोणत्याही इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.

आज आम्ही तुम्हाला पीएफ खात्यातून कशा पद्धतीने पैसे काढता येतील, सोबतच ऑनलाइन पद्धतीने पीएफ काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे गरजेचे आहेत आणि पीएफ खात्याची निगडित संपूर्ण प्रोसेस आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अशावेळी काढता येतील पीएफचे पैसे :
एपीएफओ कर्मचारी गरजेवेळी पीएफ काढण्यासाठी संपूर्ण रक्कम किंवा अंशीक रक्कम काढू शकतो. त्यासाठी कर्मचारी दोन गोष्टींशी बांधला गेलेला असणे गरजेचे आहे. एक म्हणजे व्यक्ती जेव्हा रिटायर होईल तेव्हा तो पीएफचे पूर्ण पैसे काढू शकतो. त्यानंतर दुसऱ्या कंडिशनमध्ये व्यक्ती पूर्णपणे बेरोजगार असेल तर तो पीपीएफ खात्यात गुंतवलेल्या पैशांपैकी 75% अमाऊंट काढू शकतो.

याआधी ईपीएफओ सदस्याला फक्त आजारपणासाठी पीएफचे पैसे काढता यायचे. परंतु आता तसं नाही. ईपीएफओ मेंबर त्याच्या एमर्जन्सीच्या काळात पैसे काढू शकतो. त्याचबरोबर घर घेण्यासाठी, बहिण-भावांचं लग्न, एज्युकेशन यांसारख्या कारणांसाठी पीएफमधून पैसे काढू शकतो.

ऑनलाइन पद्धतीने पीएफचे पैसे काढण्यासाठी पुढील कागदपत्रांची गरज भासेल :

* ईपीएफओ कर्मचाऱ्याला त्याच्या बँकेचे सर्व डिटेल्स द्यावे लागतील.
* त्याचबरोबर युनिव्हर्सल अकाउंट नंबर देखील लागणार आहे.
* त्याचबरोबर स्वतःची ओळख आणि ऍड्रेस प्रूफची गरज देखील भासणार आहे.
* बँकेकडून मिळालेला कॅन्सल चेक आणि आईएफएससी कोड देखील लागणार आहे.

UAN नंबरमुळे असे काढता येतील पैसे :

* सर्वप्रथम अधिकृत UAN पोर्टलवर जाऊन युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्ड टाकून व्हेरिफिकेशन करण्यासाठी साइन इन बटणावर क्लिक करा.
* पुढील प्रोसेससाठी मॅनेज टॅबमध्ये जाऊन लिस्टमधील केवायसी हे ऑप्शन निवडा. केवायसी व्हेरिफिकेशन मुळे ही गोष्ट समजेल की, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर बँकेची माहिती यामध्ये सामील आहे.
* आता पुढची प्रोसेस क्लेम प्रोसेस असणार आहे. यामध्ये तुम्हाला केवायसी व्हेरिफिकेशन नंतर येणाऱ्या ऑनलाइन सुविधा या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर क्लेम फॉर्म (31, 19, 10C आणि 10D) हे ऑप्शन मिळतील.
* पुढच्या स्टेपमध्ये सदस्य माहिती व्हेरिफिकेशन करायची आहे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर सदस्य माहिती, KYC माहिती आणि इतर सर्व माहिती समोर येईल. आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचा नंबर टाकून सर्व माहिती व्हेरिफाय करून घ्यायची आहे.
* त्यानंतर अंडरटेकिंग सर्टिफिकेट ‘होय’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
* पुढे ऑनलाइन क्लेम अशा पद्धतीचं ऑप्शन समोर दिसेल. हे ऑप्शन क्लिक करून क्लेम प्रोसेस या प्रकारावर क्लिक करा. क्लेम करण्यासाठी म्हणजेच पैसे काढण्यासाठी ‘मला पैसे काढायचे आहे’ अशा पद्धतीचं ऑप्शन तुमच्यासमोर येईल.
* त्यानंतर समोर दिली गेलेली संपूर्ण क्लेम माहिती स्पेसिफाय करून पीएफ ॲडव्हान्स (फॉर्म13) निवडून तुम्हाला किती अमाऊंट हवी आहे सोबतच तुमचा पत्ता सांगायचा आहे.
* आता शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म सबमिशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे काढण्यासाठी संपूर्ण डॉक्युमेंट्स स्कॅन करायला सांगितले जातील. संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पीएफचे पैसे अगदी आरामशीर मिळतील.

Latest Marathi News | My EPF Money withdrawal Process 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x