रत्नागिरी: कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प राज्यात विविध आंदोलनामुळे चर्चेत होता. स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी मात्र स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नाणारवासियांवर गुन्हे दाखल केल्याने कोकणात भारतीय जनता पक्षाबद्दल खदखद होती आणि त्याची झळ थेट युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला देखील बसली होती.

कोकणात विविध पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते, तर स्वतः खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी कणखर भूमिका घेतली होते हे वास्तव आहे. मात्र, ज्या भाजपकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद असूनही राणे कुटुंबीयांनी फडणवीसांना धारेवर न धरता उलट त्याच पक्षात थाटात प्रवेश केला होता आणि त्यानंतर राणे कुटुंबीयांची संभ्रमाची भूमिका कोकणवासीयांना देखील समजेनाशी झाली होते.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने राणे कुटुंबीयांची मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांवरून लक्ष करत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या टीकेकडे कानाडोळा करत केवळ स्वतःच्या कामांवर केंद्रित झाल्याने अनेकवेळा त्यांच्या टीकेला काहीच अर्थ उरत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आरे’मधील आंदोलकांवरील गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेताच, त्यावर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत त्यांना नाणार’बाबतीत झालेल्या आंदोलनांची आणि त्यानंतर आंदोलकांवर लादल्या गेलेल्या गुन्ह्यांची आठवण करून दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार नितेश राणे यांना समाज माध्यमांवर प्रतिउत्तर देण्यापेक्षा स्वतःकडील अधिकार वापरात नाणार आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याची घोषणा केली आणि आमदार नितेश राणे यांना प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिलं आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धाडसी कृतीतून राणे कुटुंबीय तोंडघशी पडल्याची राजकीय चर्चा कोकणात सुरु झाली आहे.

फडणवीसांना जमलं नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं; नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे