19 July 2019 10:15 AM
अँप डाउनलोड

गावकऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती, ते सरकारच्या भोंगळ कारभाराचे बळी

गावकऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती, ते सरकारच्या भोंगळ कारभाराचे बळी

रत्नागिरी : चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.

तिवरे धरण फुटीच्या अगोदरच या धरणाला भगदाड पडल्याची तक्रार चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही लेखी तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे ११ फेब्रुवारी रोजीच ही तक्रार देण्यात आली होती. त्यावेळी, नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्याचा साठा आणि विसर्ग नसल्याचा देखील उल्लेख या तक्रारीत करण्यात आला होता. तसेच, आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता, त्वरित या धरणाला पडलेल्या भगदाडासंदर्भात आवश्यक त्या सूचना करण्याचे देखील गावातील रहिवासी चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले होते. परंतु, नेहमीप्रमाणेच सरकारी कार्यालयाचा ढिसाळपणा अन् अधिकाऱ्यांची अनास्था या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरली आहे.

दरम्यान, तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. खासदार विनायक राऊत यांनी त्याची दखल घेत या कामाकडे लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न झाला. धरण दुरूस्तीसाठी निधीचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. तो निधी वेळेत मिळाला असता तर, सर्व ग्रामस्थांचे प्राण वाचले असते.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Shivsena(483)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या