27 April 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अजब युती सरकार! दोषी आमदार-मंत्री मोकाट; तर उंदीर, घुशी व खेकडे आरोपी: सविस्तर

Shivsena, BJP, Congress, NCP, MNS, Crab, Rat, Scam, Devendra Fadanvis, Uddhav Thackeray, Raj Thackeray

मुंबई : चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता. मात्र स्थानिक आमदार शिवसेनेचा असल्याने मंत्री महोदयांनी त्यांना विधानसभेच्या तोंडावर वाचवण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा टिकविण्यासाठी थेट खेकड्यांना दोष दिला आहे. मात्र प्रशासनाने स्वतःवरील जवाबदारी झटकून एखाद्या प्राण्याला दोषी ठरविण्याचा हा पहिलाच प्रयत्न नसून यापूर्वी देखील असे केविलवाणे प्रकार युतीच्या राज्यात घडले आहेत.

मागच्या वर्षी देखील पुण्यातील मुठा नदीचा कालवा फुटल्याने मोठी पाणीगळती होऊन प्रचंड प्रमाणावर नुकसान आणि हानी झाली होती. त्यावेळी देखील प्रसार माध्यमांनी आणि स्थानिक बाधित लोकांनी रोष व्यक्त करताच घटनेला उंदरांना दोषी ठरविण्यात आलं होते आणि सरकारने वेळ मारून घेतली होती. त्यामुळे सरकार स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी मुक्या जनावरांचा आधार घेत असल्याचं त्यावेळी देखील निदर्शनास आलं होतं.

त्याआधी सुद्धा महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभेच्या मागील मुंबई अधिवेशनात माजी महसूल मंत्री आणि भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील ‘उंदीर घोटाळा’ उघडकीस आणला, ज्यामुळे राज्य सरकारच चांगलच हसू झालं आहे. एका खासगी संस्थेने म्हणजे अशी संस्था जिचं कार्यालय कुठे आहे तेच माहित नाही अशा संस्थेला हे काम देण्यात आलं. या संस्थेने राज्याच्या मंत्रालयात केवळ ७ दिवसात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला होता.

त्यावर भाजपचे आमदार राम कदमांनी असं स्पष्टीकरण दिल की, ३ लाख १९ हजार ४०० ही उंदरांची संख्या नसून त्या उंदरांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्यांची संख्या आहे. परंतु ७ दिवसात या ३ लाख १९ हजार ४०० गोळ्यांनी किती उंदीर मेले याच काहीच स्पष्टीकरण राम कदमांनी दिलं नाही. तसेच जर त्या गोळ्यांची संख्या ३ लाख १९ हजार ४०० इतकी मोठी होती तर त्या मंत्रालयात डंपरने उतरवून मग खोऱ्याने संपूर्ण मंत्रालयात पसरवल्या का याच कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

केवळ भाजप मधल्या एका आमदाराच्या प्रश्नाला भाजपच्याच दुसऱ्या आमदाराने एक टोला लगावला की, खडसेंनी डोंगर पोखरून उंदिर काढला. बस झालं संपवला विषय इतक्यावरच काही थातुर-मातुर उत्तर देऊन. घोटाळा हा घोटाळा असतो आणि त्या घोटाळ्याची रक्कम किती लहान किंव्हा मोठी आहे यावर कदाचित त्या घोटाळ्याकडे जनतेने कस पाहावं हे ठरत असावं. म्हणूनच की काय भाजप आमदार राम कदमांनी स्पष्टीकरण देताना एक गोळी ‘केवळ दीड रुपया’ इतकीच आहे यावर जास्त जोर दिला आहे.

महाराष्ट्र मंत्रालयातील हा उंदीर घोटाळा, त्याचा दर्जा आणि त्यावर बाहेर आलेली स्पष्टीकरणं बघून महाराष्ट्रातील जनतेवर केवळ “उंदीर मामा की जय” बोलण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नव्हता. मंत्रालयातील ‘उंदीर मामा’ तर मेले, पण त्यांचे ‘सरकारी भाचे’ मात्र स्वस्तात मोकाट सुटले एवढंच जनतेने काय ते समजून घ्यावं. या उंदीर घोटाळ्यातून एकच गोष्ट जनतेला उमगली आणि ती म्हणजे सरकारी कार्यालयातील ‘फाईल्स’ हे मारले गेलेले उंदीरमामा’ नाही तर ‘सरकारी भाचे’ कुरतडत असतात जे अस्तित्वात नसलेल्या कंपनीला कामाचा ठेका देत असतात आणि बदनाम होतात ते बिचारे उंदीरमामा. त्यामुळे सध्याच्या युती सरकारने काहीच गैरप्रकार केले नसून, राज्यातील सर्व घटनांना उंदीर, घुशी आणि खेकडे जवाबदार आहेत हे स्वीकारण्याशिवाय सामान्य जनतेकडे दुसरा पर्याय सध्यातरी नाही असंच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x