3 May 2025 10:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिवसेनेसहित महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार - अनिल परब

Minister Anil Parab, CM Uddhav Thackeray, MahaVikas Aghadi MLA, MP Sanjay Raut

मुंबई, २८ सप्टेंबर : राज्यात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यातील भेटीची चर्चा सुरू आहे. फडणवीस-राऊत यांच्यातील भेटीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. राऊत-फडणवीस भेटीनंतर झालेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात काल (२६ सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे पेव फुटले होते. मात्र, संजय राऊत यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीबद्दल खुलासा केल्यानंतर चर्चेवर पडदा पडला होता.

दरम्यान शिवसेना आमदारांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांशी नव्हे तर टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, आश्वासनं कशी पूर्ण करायची, आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आमचा वचननामा आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रासमोरील प्रश्न जाणून तो सोडवण्याबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच सामना शिवसेनेचं मुखपत्र असलं तरी कोणत्याही पक्षाची बातमी त्यात लागू शकते, कोणाची मुलाखत घ्यायची हा संपादकांचा अधिकार आहे. फडणवीस भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत कुठेही अस्वस्थता नाही, शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच असा खुलासाही अनिल परब यांनी केला आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis and Shiv Sena leader MP Sanjay Raut are currently discussing the meeting. After the meeting between Fadnavis and Raut, NCP President Sharad Pawar today called on Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena leader Uddhav Thackeray. The discussion between the two leaders lasted for about an hour.

News English Title: Minister Anil Parab said CM Uddhav Thackeray will meet all MahaVikas Aghadi MLA Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या