15 December 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

९० टक्के मिळवून देखील पसंतीच्या कॉलेजसहित अकरावी प्रवेशात अडचणी - सविस्तर वृत्त

SSC Exam, HSC Exam, CBSE, ICSE

मुंबई, २९ जुलै : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला.

त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, एकूण आकडेवारीतून वेगळीच चिंता समोर आली आहे.

अनेकांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळाल्याने आनंदही झाला असेल. पण एवढे गुण मिळवूनही आपल्या पसंतीचं कॉलेज मिळवण्यात या वर्षी अडचण येऊ शकते. कारण या वर्षीच्या निकालाचं वैशिष्ट्य पाहता ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट झाली आहे.

८३,२६२ विद्यार्थ्यांना या वर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या २८५१६ होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या अंदाजाने किती टक्के गुणांना पसंतीचं कॉलेज असा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी पुणे विभागातले आहेत. १५४६६ विद्यार्थ्यांना ९० हून अधिक टक्के आहेत. मुंबई विभागातही १४७५६ विद्यार्थी या ९० क्लबचे सदस्य झाले आहेत. म्हणजेच सर्वाधिक लोकप्रिय महाविद्यालयं जिथे प्रवेशासाठी तुंबळ स्पर्धा आहे, तिथली स्पर्धा यंदा आणखी तीव्र होणार आहे. अर्ध्या आणि पाव टक्क्यांनी पसंतीच्या कॉलेजची अॅडमिशन गेली, असंही होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० क्लबचे सदस्य वाढले आहेत. सर्वाधिक वाढ कोकण विभागात दिसते. ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागवार संख्या अशी आहे.

 

News English Summary: Many may have been happy to get more than 90 percent marks. But despite getting so many marks, it may be difficult to get the college of your choice this year. Because of this year’s results, the number of students getting marks above 90 per cent has tripled compared to last year.

News English Title: MSBSHSE Maharashtra board SSC result 2020 Marathi increase in 90 percent students tough for class xi admission News latest updates.

हॅशटॅग्स

#SSC(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x