महत्वाच्या बातम्या
-
पुणे | PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे, अधिकाऱ्याची तक्रार
पुण्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती होती.
4 वर्षांपूर्वी -
मुबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठक | निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या - फडणवीस
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठक | राज्यात लॉकडाऊनशिवाय आता पर्याय नाही - मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महाभारत मालिकेतील इंद्रदेव आणि अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनामुळे निधन
बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘महाभारत’मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी आणि पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा जिव महत्वाचा | पण भाजप नेत्यांकडून वातावरण तापवायला सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान | संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंकडून महाजनांच जळगावातील साम्राज्य खालसा करण्याची तयारी | जिल्हा परिषदही धोक्यात?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने जळगाव महानगरपालिकेत भाजपाला धूळ चारत स्वतःचा महापौर बसवला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जोरदार धक्का दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेगाने हातपाय पसरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | भाजपची सत्ता असल्याने महापौरांनी लस बाबत मोठी घोषणा केली, पण केंद्राने दिल्या एवढ्याच..
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडीशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ?, मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे - भाई जगताप
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरसंघचालक मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह | रुग्णालयात दाखल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून, शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यात लॉकडाऊन बाबत मत जाणून घेण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी भाजप नेत्यांनी दिल्लीतून १ कोटी लस आणाव्या - शिवसेना
देशात आणि राज्यात दररोज विक्रमी संख्येनं आढळू येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला असून, रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र राज्यातील काही शहरांमध्ये दिसत आहे. त्यातच केंद्र आणि महाराष्ट्रात ‘लस’कारणारून जुंपली आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून, राजकारण तापलं आहे. लसीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस निर्यात, कंट्रोल, पुरवठा आणि नियम करतात मोदी | तुटवड्याला ठाकरे, नेहरू जवाबदार
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होतं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपच्या १०५ आमदारांना निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या - संजय राऊत
एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व पक्षीय बैठक | लॉकडाऊनची चर्चा?
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे NIA'च्या कस्टडीत असताना हे पत्र मीडियात कसे लीक झाले? | कोर्टात प्रश्न
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) सध्या अँटिलिया स्फोटक जप्ती प्रकरण आणि स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्र ATS ने हिरेनच्या हत्येचा तपास सुरू केला आणि माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी राजेश गोरे यांना अटक केली. सचिन वाझे 9 एप्रिलपर्यंत NIA ताब्यात आहेत. त्यानंतर आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने वाझे यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
4 वर्षांपूर्वी -
मोठा निर्णय | विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
पहचान कौन? असं ट्विट करणाऱ्या अमृता फडणवीसांना शिवसैनिकाने दिलं असं उत्तर की हसून.....
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच ठाकरे सरकारवर बोचऱ्या टीका करताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर, अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह आणि ठाकरे सरकारवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC