महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? | त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भारतीय जनता पक्षात दिसले असते”, असा दावा त्यांनी केला होता. त्याच मुद्द्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. एक पत्रकाराने त्यांना, जयंत पाटील खरंच भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बगल दिली.
5 वर्षांपूर्वी -
या निवडणुकीच्या निकालांनंतर राज्य सरकार व नेतृत्व बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल - गिरीश बापट
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून, मतदार यादीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान असणार आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली पार पडणाऱ्या या निवडणुकीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी सायंकाळी ४ ते ५ ही वेळ ठेवण्यात आली असून, इस्पितळांमध्ये दाखल असलेल्या मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या सर्वच्या सर्व जागा भाजपच जिंकणार - चंद्रकांत पाटील
राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या सर्वांच्या सर्व जागांवर आम्हीच विजयी होणार असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या सर्व जागांवर जोरदार चुरस आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला विजयाची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नव्हे तर पुण्याची जागा तर एकतर्फी असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले
5 वर्षांपूर्वी -
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि सर्वत्र धक्कादायक बातमी पसरली. त्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातील डॉ. दिगंत आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे,” असं डॉ. दिगंत म्हणाले. डॉ. दिगंत हे प्रकाश आमटे यांचे चिरंजीव आणि डॉ.शीतल आमटे यांचे चुलत भाऊ आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भाजपच्या काळातील वकीलच सुप्रीम कोर्टात लढवत आहेत | तरीही जाणीवपूर्वक...
मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातारच्या गादीचे वारसदार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा प्रतिप्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
BHR Scam | खडसेंकडून गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर | बड्या व्यक्तींचा नामोल्लेख टाळला
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले आहेत. झंवर हे हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ | समाज माध्यमांवर सुप्रिया सुळेंची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावानं फेक मोबाइल नंबर देखील शेअर करण्यात आला आहे. त्या चुकीच्या माहितीद्वारेच सदर क्लिप शेअर केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ह्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BHR Society Scam | सुनील झंवर यांच्या कार्यालयात महाजनांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचं वृत्त
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या बाबतीतही तेच घडणार असल्याचे तर्क लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने देखील भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील भाजपच्या नेत्यांचे कनेक्शन शोधून त्यांच्या मागे हात धुवून लागणार याचे संकेत देखील राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळत होते. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार बैलासारखं | सतत टोचल्याशिवाय पुढेच जात नाही - गडकरी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. तसं केल्याशिवाय ते पुढेच सरकत नाही, असं टीकास्त्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोडलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात नितीन गडकरी संबोधित करत होते.
5 वर्षांपूर्वी -
MHT CET Result 2020 | सीईटी निकालात टॉपर्स संख्येत वाढ
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MHT-CET परीक्षेचा निकाल शनिवारच्या रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आला. सदर निकालात PCB Group १९, तर PCM Group २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ८५ पर्यंत पर्सेंटाइल मिळवणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या PCM Group २६ हजार ५०२, तर PCB Group मध्ये एकूण ३२ हजार ७९६ विद्यार्थी इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवार कुटुंबानं स्वप्नातलं सत्यात उतरवलं | म्हणून तर १०५ आमदार असून घरी बसावं लागलं
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का? अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “‘स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानं उतरवलं आहे. तसं नसतं तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावं लागलं नसतं,’ असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
घटनेचे साक्षीदार राऊत | त्या सकाळच्या शपथविधीवर खुलासा | म्हणजे पुस्तकी दावे खोटे?
मागील वर्षी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनं राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. केवळ ३ दिवस टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकातून समोर आली होती. या शपथविधीची तयारी कशी झाली हे ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकात (Book ‘Trading Power’ wrote by Priyam Gandhi) नमूद करण्यात आल्याचं प्रियम गांधी यांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कधी महिला, कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख | मग हे जिव्हारी का लागलं?
कोर्टाच्या एका निकालावर राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुखमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्या काळात अनेकांनी धमक्यांचे ऑडिओ-व्हिडीओ क्लिप पाहिले | ते पुन्हा काढायला लावू नका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते काय लिहतात | काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे - फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणे गंजलेली ताेफ | अशा तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं - जयंत पाटील
राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं असं भाकीत वर्तवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP State President Jayant Patil criticized BJP MP Narayan Rane) अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या मुलाखतीवरून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची 'लायकी' काढली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (२८ नोव्हेंबर) पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज कोरोना लस'चा आढावा | मोदींच्या दौऱ्याला इव्हेंटचं स्वरूप
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी पुण्याच्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देऊन वैज्ञानिकांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. एकूण पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि समस्त राज्य व देशात एक अनुभवी राजकीय नेते म्हणून सर्वश्रुत असलेल्या शरद पवारांनी प्रथम एखाद्या कोरोना लस संदर्भात आढावा घेतल्याने देशभर वृत्त पसरलं होतं. मात्र कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीला मोदींनी ज्याप्रमाणे आपत्ती उत्सव असल्याप्रमाने इव्हेन्ट केले होते. मात्र आता भारतासहित जगभर कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या बातम्या फिरू लागल्याने मोदी पुन्हा इव्हेंटसाठी सज्ज झाल्याचं जाणार अंदाज व्यक्त करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी धर्म | चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER