महत्वाच्या बातम्या
-
एका व्यक्तीच्या लाडापोटी आम्हाला बाजूला केलं | त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असला तरी फडणवीसांवर त्यांचे राजकीय हल्ले सुरूच आहेत. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष सोडल्याचे देखील म्हटले होते. तसेच फडणवीस यांनी कसे खालच्या पातळीचे राजकरण केले याचा पाढा पत्रकार परिषदेत वाचला होता.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यात भाजपमध्ये गटबाजी वाढली | महत्वाच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा
निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान गटबाजीला कंटाळून भाजपच्या महत्वाच्या नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील गटबाजीला कंटाळून अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं राजकारण | तरी राज्यात करोडोची गुंतवणूक आणली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून जनतेशी संवाद साधला. दरम्यान यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना फटाक्यांमुळं कोरोना वाढण्याची शक्यता देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील मंदिरे का खुली करत नाहीत? यावरून देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेत डिपॉझिट जप्त | आता बिचुकले पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सज्ज
कलर्स मराठीवरील बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी २०१९ मधील निवडणूक थेट मुंबईतील वरळी मतदारसंघांतून म्हणजे थाट आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धच लढवली होती. त्यावेळी चर्चेत असले तरी निवडणुकीत काही विशेष करतील असं चित्र नव्हतं. त्याप्रमाणेच निकाल आले आणि अभिजित बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र आता अभिजित बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता त्यांनी थेट पदवीधर मतदारसंघाची निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन 78 पदांची भरती
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२० पात्र व इच्छुक उमेदवार केआरसीएल भरती २०२० साठी २७ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि ऑनलाइन अर्ज कसे करावे आणि ऑफलाइन अर्ज यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची संधी अजिबात वाया घालवू नका.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाला विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही | निवृत्त जस्टीस पी. बी. सावंत
Republic TV’चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी कोर्टाने २ आठवड्यांचा कालावधी विधिमंडळ सचिवांना दिला आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केली जाऊ शकत नाही, असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा मुडेंना माजलगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीकडून राजकीय धक्का
मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीने जोरदार राजकीय धक्का दिला आहे. माजलगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर चक्क आपल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची वेळ आली. एनसीपीने भारतीय जनता पक्षाला राजकीय दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजूर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यातच राष्ट्रवादीने एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिवाळीनंतर १० वी -१२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळा ? | शिक्षण मंत्री म्हणाल्या
अनलॉक ५ ची अंमलबजावणी राज्य सरकारकडून वेगाने सुरु असून येत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याचे संकेत याआधीच मिळाले आहेत. कालच सिनेमा थिएटर्स तसेच मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पुढची महत्वाची आखणी सुरु झाली आहे आणि ती म्हणजे राज्यातील शाळा सुरु करणे.
5 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली - निलेश राणे
प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केलं होतं. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील आणि राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कालच्या घटनेचा संबंध भारतीय जनता पक्षाने थेट आणीबाणीशी जोडला तर, आता दुसरीकडे भारतीय जाताना पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांभोवतीच वेगळा संशय व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दुख: दिसत नाही | पण भाजपाची तळी उचलणाऱ्या संपादकांचं दुख दिसतं
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | सिनेमागृहांचा पडदा उद्यापासून उघडणार | राज्य सरकारचा निर्णय
अनलॉक ५ ची सुरुवात होऊन अनेक गोष्टी हळूहळू सामान्य लोकांसाठी खुली होतं आहेत. लॉकडाऊन मधून राज्य पूर्णपणे बाहेर येण्याच्या जवळ येऊन ठेपलं आहे. मागील काही दिवसात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातील तब्बल ७ महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह उद्यापासून खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या म्हणजे गुरुवारपासून राज्यातील सिनेमागृह तसेच नाट्यगृह सुरू करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
..अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही | खा. नवनीत राणा संतापल्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. ठाकरे सरकारने बळीराजासाठी १०,००० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात अजून पंचनामे झाले नसल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात पक्ष मेळावे | खडसेंपुढे भाजपच्या संकटमोचकांची संकटं संपेना
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील जाहीर प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जोरदार पदाधिकारी मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा पक्ष मेळावा पार पडला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरमधून निवडून येणार होतात | मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं
राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून निवडून येणार होतात असं म्हणता मग पुण्यात कोथरूड मधून मेधा कुलकर्णी यांचा अधिकार भारतीय जनता पक्षाने का डावलला? असा प्रतिप्रश्न करत अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. कालच त्यांनी राष्ट्रवादीला आव्हानाची भाषा करताना कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं राजकीय चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत | राष्ट्रवादीचा पक्षविस्तार
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगमध्ये अनेक भाजप पदाधिकारी राष्ट्र्वादीत प्रवेश करत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्र्वादीने पक्ष विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल | खडसेंची गर्जना
दोन दिवसांपूर्वी भाजपने मुक्ताईनगर मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले होते. त्यात गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाने मागील काही दिवसात घेतलेले पक्ष मेळावे वाया गेल्याच चित्र आहे, कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला नव्हे तर राष्ट्रवादीला महत्व देत एकनाथ खडसे यांचावर विश्वास दाखवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Good News | राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे
महाराष्ट्र आज संपूर्ण दिवसभरात एकूण १०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ४,००९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा तसेच कोरोना मृतांचा आकडा जलदगतीने खाली येताना दिसत आहे जे सकारात्मक म्हणावं लागेल. मागील तब्बल ७ महिन्यांपासून कोरोनानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होतं, पण आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे असं आकडेवारी सांगते.
5 वर्षांपूर्वी -
आरोग्य मंत्री म्हणतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी | टाटा इन्स्टिट्युट म्हणतं लाट येणार
गेल्या महिन्यात अगदी शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा उचल घेत असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी मृत्यू दर मात्रं कमी होताना दिसत आहे. मृत्यू दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं म्हटलं गेलं.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेना खा. विनायक राऊत मास्क काढून बैठकीतच शिंकले | बेजवाबदार लोकप्रतिनिधी
राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी झाला असला तरी कोरोनाचा एकूण परिणाम सुरूच आहे आणि रोज नवनवी आकडेवारी समोर येतं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वारंवार सामान्य लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. कोरोनावर अजून लस आली नसल्याने मास्क आणि इतर उपाय योजनाच सध्या कोरोनावर उपाय असल्याचा सरकार वारंवार सांगत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या संकटमोचकांना धक्का | खडसेंचा भाजपावर पहिला राजकीय सर्जिकल स्ट्राईक
दोन दिवसांपूर्वी भाजपने मुक्ताईनगर मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले होते. त्यात गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाने मागील काही दिवसात घेतलेले पक्ष मेळावे वाया गेल्याच चित्र आहे, कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला नव्हे तर राष्ट्रवादीला महत्व देत एकनाथ खडसे यांचावर विश्वास दाखवला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL