महत्वाच्या बातम्या
-
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील २१ उमेदवारांपैकी १७ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना यंदा एकूण २३ जागा लढवणार आहे. पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार यावेळी शिवसेनेने जाहीर केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
एनसीपीच्या भारती पवार आणि काँग्रेसचे प्रविण छेडा भाजपात, लोकसभेची उमेदवारी मिळणार?
नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. भारती पवार आणि मुंबईतील काँग्रेसचे नेते प्रविण छेडा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भारती पवार व छेडा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा झेंडा हातात देऊन स्वागत केले. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तर प्रविण छेडा हे ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या दोघांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे आता निश्चित मानले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे शिवसेनेचे वाघ? पालघर शिवसेना नगरसेवकाची जन्मदात्या आईला संपत्तीसाठी मारहाण
जन्मदात्या आईची संपत्ती स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी शिवसेना नगरसेवकाने आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक मकरंद पाटील यांनी हा संतापजनक प्रताप केला आहे. सदर प्रकरणी मकरंद पाटील, त्यांची पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्याविरोधात मकरंद पाटील यांच्या आईने पालघर पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा: सनातन समर्थकाच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेस अडचणीत
काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि कट्टर हिंदुत्ववादविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- लोकसभा मतदारसंघातून सनातन समर्थक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीकडून धक्का, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षांमध्ये दल बदल सुरु झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी एनसीपी’मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
निलेश राणेंच्या उमेदवारीवरून नारायण राणेंवर भाजपचा दबाव?
खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी करत पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. परंतु आता निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि युतीधर्म पाळावा म्हणून भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणेंवर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे. यामुळे खासदार नारायण राणे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर लोकसभेसाठी माकपचा बविआला पूर्ण पाठिंबा, आता तिरंगी लढत होणार
माकपकडून पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, तर त्यामोबदल्यात दिंडोरीत बहुजन विकास आघाडीकडून माकपला सर्वतोपरी मदत सहकार्य देण्याचं आश्वासन बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
या दोन नेत्यांनी घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय, पण ही आहे योजना? सविस्तर
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु, लोकसभा निवडणूक न लढविण्याची चर्चा मनसेवर केंद्रित असली तरी तसाच प्रकार तामिळनाडूच्या राजकारणात देखील झाला आणि त्यानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. मात्र सध्या तामिळनाडूतील लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याच चित्रं अनेक सर्व्हेमध्ये समोर येत आहे आणि त्यात भाजपाला एआयडीएमके’सोबत युती करून देखील काहीच उपयोग होणार नसल्याचं चित्र समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मोदी'लाटे पुर्वी विधानपरिषदेसाठी कृष्णकुंजचे उंबरठे झिजवले, आज आव्हान?
रंग शारदामध्ये नेहमी नाटकाचे प्रयोग होतात तसाच १ नाटकाचा प्रयोग काल झाला आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेला पदाधिकारी मेळावा अशी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख बारामतीचा पोपट असा केला होता आणि ते अधोरेखित करणारे त्यांचे आजचे भाषण होते.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुखराज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल २६ वर्षानंतर अनिल गोटे-शरद पवार भेट
भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बल २६ वर्षांनंतर भेट घेतली आहे. एकमेकांचे कायम टीकाकार राहिलेल्या गोटे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुभाष भामरेंचा पराभव करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत यात महाराष्ट्रातील एकूण ७ उमेदवारांचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना संधी देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सोलापुरात मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर?
लोकसभा मतदारसंघ माढा इथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. परंतु, त्यातदेखील माढ्याच्या जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील प्रचंड नाराज आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांच्या २ मालमत्ता जप्त
तीन मोठ्या सरकारी बँकांचे तब्बल ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे व्यवसायाने विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता बँकांनी जप्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांची उमेदवारी अडचणीत?
लोकसभा निवडणूक घोषित झाल्या आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच त्यांच्या नावासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का? रामदास आठवले
प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली असून त्यांच्या सभांना जनतेकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. परंतु, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचे चौकीदार मंगेश सांगळेंकडून १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग, गंभीर गुन्हा दाखल
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा गंभीर असल्याने अटक होण्याच्या भीतीने मंगेश सांगळे हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपने नाही, शिवसेनेने एनसीपीच्या शरद पवारांना प्रवेश दिला होता, ते पुन्हा नगरसेवकही झाले नाहीत
अमरावती येथील युतीच्या मेळाव्यात भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्ष होत असल्याचा धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत, निदान आता शरद पवार यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन नका टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
त्या बैठकीला मोदीच गैरहजर होते, त्यामुळे मी पुलावामाचा बदला घेण्यासाठी जवानांनाच आदेश द्या असं सुचवलं
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारताचे तब्बल चाळीस जवान शहीद झाले होते. देशातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर काही दिवसातच या हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकद्वारे घेण्यात आला. यात ३०० पेक्षा अधिक दहशतवादी मारल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु, ही कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते चाकण येथे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनी मला नेहमीच गोरगरीबांच्या मुलांची काळजी घ्यायला शिकवलं: उद्धव ठाकरे
युतीपूर्वी आमच्यात मतभेद होते, त्यावेळी आम्ही भारतीय जनता पक्षावर जाहीर टीका केली. परंतु हे मतभेद शिवसेनेने कधीही राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत. आम्ही एकमेकांमध्ये कधीही तंगड घातलं नाही, असा एकतरी मुद्दा दाखवा, असे स्पष्टीकरण देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. आघाडी करताना हातात हात घालून त्यांनी तंगड्यात तंगडं घातलं आहे, त्यामुळे ते नक्कीच पडणार असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS