महत्वाच्या बातम्या
-
हिंदुत्वाच्या नावावर असा खेळखंडोबा काँग्रेसच्या काळात सुद्धा झाला नव्हता: उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उफाळलेला केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेने मोदी सरकार आणि आरएसएस’वर सामनामधून बोचरी टीका केली आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर देशात सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा तर काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा झाला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामनामधून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुंतवणुकदारांचे पैसे थकवले, भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल'ची खाती सेबीकडून सील
गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेलार मामा, हे बघा! भागवतांना सुद्धा चौकीदारची मूलाखत समजली नाही: गजानन काळे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आणि ते भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिसले. त्या व्यंगचित्रात स्वतः मोदी हेच मोदी यांना प्रश्न विचारत असल्याची मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर चवताळलेले भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी लगेच ट्विट करत, ‘राज ठाकेर यांना ही मुलाखत समजणं अवघड असून त्यांनी चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम बघावा’, असा खोचक टोला लगावला होता.
6 वर्षांपूर्वी -
आता पहिली जमीन कोण विकणार? जमीन इका, पन पक्षाचं ऑफिस काढा: जानकर
रासप पक्षाची औकात शून्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो चौकाचौकात पक्षाची औकात निर्माण करा. आणि तशीच वेळ पडल्यास स्वतःची जमीन विका, पण पक्षाचं ऑफिस काढाच, असा धक्कादायक आणि अजब सल्ला राज्याचे पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी रासपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिला आहे. ते सांगलीत एका पक्ष कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकणात सेनेला गळती, असंख्य शिवसैनिकांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश
लोकसभा निवडणुकीआधी कोकणात शिवसेनेला सोडचिट्ठी देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सत्तेत विराजमान असलेल्या शिवसेनेबद्दल कोकणात विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाला आहे. त्याचा फटका शिवसेनेला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसायची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा अपवाद वगळता, एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही: मांजरेकर
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर अर्थात समोर नाव येते ते पुलंचेच. होय! पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावाची काय जादू आहे हे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आज सुद्धा जाणतो. लवकरच म्हणजे अगदी शुक्रवारी त्यांच्या आयुष्यावर ‘भाई’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. परंतु, दुर्दैव हे की अशा महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्वाच्या थिएटर्समध्ये स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही.
6 वर्षांपूर्वी -
‘बोला काय विचारू?’, ‘मोदीमय’ मुलाखतीची राज ठाकरेंकडून खिल्ली
पंतप्रधानांच्या त्या मुलाखतीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. मोदींची ती मुलाखत म्हणजे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारल्यासारखं होतं, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानांना लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे स्वतःच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी “बोला काय विचारु ?” असं प्रश्न ते स्वतःलाच दुसऱ्या बाजूने करत आहेत असं दाखवलं आहे. त्या मुलाखतीचा एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला असून, ती ठरवून केलेली मुलाखत होती असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची मुलाखत म्हणजे चहाच्या पेल्यातले वादळ : उद्धव ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले आणि मोदी हे केवळ बचावात्मक पवित्र्यात दिसले तसेच २०१९ ची चिंता त्यांच्या हावभावात स्पष्ट दिसत होती, अशा बोचरी टीका सामनामधून मोदींच्या मुलाखतीवर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगमहर्षि रतन टाटांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरूडेशी होणार असून नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मंडळींना आमंत्रित करत लग्न अगदी साध्या पद्धतीने करणार असल्याचे राज ठाकरे यांनी याआधीच सांगितले होते. त्यामुळे घरातील आणि नात्यांमधील ती मोजकी मंडळी कोण याची सरावांनाच उत्सुकता होती.
6 वर्षांपूर्वी -
नगर: प्रथम सेनेकडून एनसीपी व काँग्रेससोबत पाठिंब्यासाठी चर्चा सुरु होती: रामदास कदमांचा गौप्यस्फोट
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेला झटका शिवसेनेच्या फार जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि एनसीपीशी चर्चा केली होती. परंतु, एनसीपीने आयत्यावेळी धोका दिल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आंबेडकरी बांधवांनी केले विजयस्तंभाला अभिवादन
भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून आज म्हणजे 1 जानेवारीला लाखो आंबेडकरी अनुयायी जमा झाले आहेत. दरम्यान, यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर उसळलेला हिंसाचार लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही' : नितेश राणे
आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सामनातील आजच्या संपादकीय मध्ये आलेल्या अग्रलेखाचा संदर्भ घेऊन निलेश राणेंनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा त्यांच्याच भाषेत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई : नेहरूनगर - पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
मुंबई : नेहरूनगर – पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
6 वर्षांपूर्वी -
धुळ्यात भाजपचे चंद्रकांत सोनार महापौरपदी विराजमान
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची वर्णी लागली आहे. महानगरपालिका निवडणुकीत एकूण ७४ जागांपैकी भाजपने ५० जागांवर घवघवीत यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे अन्य कुणाची सुद्धा मदत न घेता भारतीय जनता पक्षाने स्वबळावर धुळे महानगर पालिकेत सत्ता स्थापन केली.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारचा जन्मच मुळात अनैतिक संबंधांतून झाला आहे: उद्धव ठाकरे
भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भंडारा: अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला
भंडाऱ्यातील अभयारण्यात आज सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. सकाळच्या सुमारास पर्यटक तसेच गाइड यांना सफारीदरम्यान हा वाघ मृत अवस्थेत आढळला. दरम्यान, वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या मृत्यूचं मूळ कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण : पालशेत किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरले
निसर्गरम्य कोकणात सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु, त्याचवेळी पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांच्या भेटीला स्वतः डॉल्फिन्स सुद्धा आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
९ महिन्यात ११, ९३२ बालमृत्यू, जवाबदार मंत्र्यांचा वेळ कुठे...सीएम चषक?
महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणारे बालकांचा मृत्य अजून जैसे थे अशीच अवस्था आहे. सरकार बदलून सुद्धा बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. केवळ जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल ११,९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे प्रमाण आधीच धक्कादायक असताना त्यात कमी वजनाच्या बालकांचे सुद्धा प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे शिवसेनेचे नेते कुठेही डोकं लावतात! - रावसाहेब दानवे
शिवसेनेचे नेते कुठे सुद्धा डोकं लावतात असं खिल्ली उडवणारे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्याला निमित्त आहे ते राज्य सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली, असे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी दुपारी सुपूर्द केले. राज्यातील बळीराजाचे कर्ज माफ करावे आणि राज्य सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन केवळ जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे शेतकर्यांची केवळ क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा कडक शब्दांमध्ये ते निवेदन देण्यात आल्याने, रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेत्यांवर ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हा घ्या पुरावा... शिवसेनेनेच मागितला होता श्रीपाद छिंदमचा पाठिंबा
हा घ्या पुरावा… शिवसेनेनेच मागितला होता श्रीपाद छिंदमचा पाठिंबा
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH