महत्वाच्या बातम्या
-
प्रदेश भाजप ओबीसी माेर्चाची बैठक | 'राष्ट्रीय' शब्दाआडून पंकजांना डावललं | पर्यायी नेतृत्वाला बळ ? - सविस्तर
मुंबई येथे सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ झाला. आश्चर्य म्हणजे पक्षात ओबीसींचे नेतृत्व करत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला अनुपस्थित होत्या. पंकजा यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Ashadhi Ekadashi 2021 | मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली आषाढी यात्रा पंढरपुराने पाहिली आहे. तीच वारी आम्हाला परत पाहायला मिळाली पाहिजे. ‘हे विठ्ठला कोरोनाची संकट लवकरात लवकर दूर कर आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे आषाढी वारी, वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली पंढरी पाहू दे’ असे साकडे पांडुरंग चरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले आहे.
4 वर्षांपूर्वी -
एकाचवेळी मिळणार १०'वीचे गुणपत्रक आणि सनद | विद्यार्थ्यांना सनदसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालनंतर आजवर ८ दिवसाच्या अंतराने गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र आता निकालानंतर मिळणाऱ्या गुणपत्रिकारबरोबरच सनद देखील मिळणार असल्याची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.
4 वर्षांपूर्वी -
SSC निकाल झाला | 11'वी प्रवेशासाठी CET परीक्षेची तारीख जाहीर | प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांच्या नाशिक दौऱ्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत वाद | एका प्रभाग समितीवर शिवसेनेची बाजी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकचा दौरा करून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या होत्या. त्यानंतरही भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठी धुसपूस असल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपमधील काही पदाधिकारी शिवसेनेला मदत करत असल्याचं देखील सिद्ध झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | पुढचे 5-6 दिवस अतिमुसळधार पावसाचा IMDचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील ५ ते ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात
पूढील वर्षी होणाऱ्या पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सलग ३ दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. या बाबत वारकर्यांनी सर्वोच्च न्यायालयात पायी वारीसाठी परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हि याचिका फेटाळली आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोना असल्याने वारीला संमती देण्यात आलेली नाही. वारीला संमती मिळावी म्हणून वारकऱ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? | जाणून घ्या सविस्तर
नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो. व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याचं वृत्त चुकीचं | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ED समोर चौकशीला जाणार
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारी देखील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
Pegasus Hacking | फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा - काँग्रेस
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस चक्क पुण्याचे शिल्पकार? | धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त - आ. मिटकरी
पुण्यातील काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा होत होती. समाज माध्यमांवर त्यांच्या होर्डींगचा फोटोही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका होर्डिंगवरून ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप
मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
'लाव रे तो व्हिडिओ' नंतर राज ठाकरेंचं आता 'बघा रे माझे व्हिडिओ' | 'ते' व्हिडिओ भाजपाला पाठवणार
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास १० जंगी सभा घेत मोदी सरकारविरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांची पोलखोल केली होती. विशेष म्हणजे मनसेने १० सभांच्या आयोजनावर जेवढी मेहनत आणि पैसा खर्च केला असेल, तेवढा त्यांनी स्वतःच्या पक्षातील किमान २ जागांसाठी जरी जोर लावला असता तर मनसेचा किमान एक खासदार आज लोकसभेत असला असता. मात्र त्यांनी तसे न करता केवळ मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी जी ताकद आणि अर्थकारण खर्ची घातलं, त्याने त्यांच्याविरोधातच प्रश्न चिन्हं निर्माण झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचं गुजरातीकरण? | अदानी एअर पोर्ट होल्डिंगचं मुख्यालय मुंबईत नव्हे तर अहमदाबादमध्ये असेल
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय | आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?
शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात तयार करण्यात आले असून आषाढी एकादशीचे औचित्य साधत कार्यालयाचे भव्य उद्घाटन केले जाणार आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेल्या मणियार बंधुनी लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert | राज्यांत 2-3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज | अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळण्याचा धोका
देशात मान्सून अधूनमधून सक्रिय होत आहे. या पावसामुळे देशातील अनेक शहरांत कहर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले असून बस, ट्रेन आणि विमानाच्या उड्डाणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळल्याने यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 5 घरेही कोसळली आहेत. बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची स्वप्नं पडणं हा आजार आहे - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदशाध्यक्षा शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज आणि माझी जुनी मैत्री, पुढच्या आठवड्यात मी मुंबईतही त्यांना भेटणार आहे - चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्राम गृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे हाताची घडी घालून उभे होते. तर चंद्रकांतदादा त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते. राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते.
4 वर्षांपूर्वी -
भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | वाचा सविस्तर माहिती
विविध शासकीय योजनांसाठी भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER