14 December 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता | फडणवीस-चंद्रकांतदादांना होर्डिंगवरही स्थान नाही

BJP, Corporator Ravi Landge, Pune, hoardings

पिंपरी, १९ मार्च: पुण्यातील एक होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या होर्डिंगमध्ये भाजप नगरसेवकाने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ४० वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपाची सेवा करतंय…हे आमचं चुकलं का? सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का? अशी विचारणा नगरसेवकाच्या वतीने करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या वतीने हा होर्डिंग लावला असून तीव्र व्यक्त करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड भाजपमध्ये एकटे रवी लांडगे नाराज आहेत असं नाही. तर नगरसेवक शितल शिंदे यांनी देखील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी डावलले म्हणून थेट बंडखोरी केली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या साथीने अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ते उभे ठाकले होते. नंतर सदस्य पदाचा राजीनामा ही दिला होता. नाराज नगरसेविका माया बारणे यांनी देखील नुकतंच शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिलाय. नगरसेवक तुषार कामठे यांनी भाजप विरोधातच आंदोलन केलं होतं, तेव्हा त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.

नुकतीच महानगरपालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात त्यांचं नाव अग्रेसर होतं, मात्र त्यांच नाव डावलून इतरांना अध्यक्षपद देण्यात आल्याने ते दुखावले गेले होते. यामुळेच त्यांच्या समर्थकांनी शहरभर अशा आशयाचे फलक लावून भाजपशी निष्ठावान राहूनदेखील डावलल जात असल्याने उघड नाराजी व्यक्त केल्याचं चित्र आहे. याचे पडसाद येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नसून फलकाची स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

या होर्डींगवर लोकनेते भाजपचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्व. अंकुशराव लांडगे आणि वडिलांचे फोटो आहेत. वुई सपोर्ट रवी लांडगे असा मजकूर या फ्लेक्सवर आहे. याद्वारे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दादच पक्षाच्या वरिष्ठांकडे मागितल्याची चर्चा भोसरीतच नाही, तर संपूर्ण शहरात रंगली आहे. दरम्यान, त्यांचा राजीनामा महापौरांनी स्वीकारलेला नाही. तसेच ते आतापर्यंतच्या दोन्ही स्थायीच्या समितीला गैरहजर राहिलेले आहेत.

शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार असलेल्या संपूर्ण भोसरी मतदारसंघात त्यांनी असे भलेमोठे चाळीसेक होर्डिंग लावल्याने शहरभर तो चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी अध्यक्ष निवडीत ऐनवेळी डावलण्यात आल्याने त्यांनी तडकाफडकी स्थायी सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. त्याच दिवशी पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी जुन्या एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप केला होता.

 

News English Summary: A hoarding in Pune is currently under discussion. In this hoarding, the BJP corporator has openly expressed his displeasure. Is it our fault that our family has been serving BJP for 40 years? Is it our mistake to adopt self-respecting politics and not politics of convenience? Such a request has been made on behalf of the corporator. The hoarding has been erected on behalf of ruling BJP corporator Ravi Landge.

News English Title: Serve BJP for 40 years BJP corporator Ravi Landge puts up hoardings of displeasure news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x