30 April 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट
x

दिवसभरात कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले

Corona Crisis, Covid 19, Kalyan Dombivli

कल्याण-डोंबिवली, ०४ मे : महाराष्ट्रातला कोरोनाचा वेग कायम आहे. राज्यात आज ६७८ नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या १२९७४ एवढी झाली आहे. तर आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. आज ११५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत २११५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.

कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ६८ रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-पश्चिम मधील ३, कल्याण पूर्व मध्ये३, डोंबिवली पूर्व मध्ये ५, डोंबिवली पश्चिम मध्ये २, टिटवाळा येथे ५ रुग्ण आढळले आहेत.

कल्याण- डोंबिवलीत रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. महापालिकेनं १० हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. तर १२२ पैकी २० प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर केले आहेत.

केडीएमसीतील हॉट स्पॉट

  • डोंबिवली पूर्व – म्हात्रे नगर, आयरे गाव, तुकाराम नगर, छेडा रोड
  • डोंबिवली पश्चिम – रेतीबंदर रोड, टेल्कोस वाडी
  • कल्याण पूर्व – चिंचपाडा, भगवान नगर
  • कल्याण पश्चिम – खडकपाडा, वायले नगर

 

News English Summary: In Kalyan-Dombivali, the highest number of 18 corona patients has increased today. Therefore, the total number of patients in the municipal area has reached 213. So far 68 patients have been cured. Among the patients found today are 3 in Kalyan-West, 3 in Kalyan East, 5 in Dombivali East, 2 in Dombivali West and 5 in Titwala.

News English Title: Story 18 corona patient increase in Kalyan Dombivli city News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x