13 December 2024 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Alok Industries Share Price | रिलायन्स कंपनीचा 26 रुपयाचा स्वस्त शेअर अल्पावधीत मोठा परतावा देतोय, वेळीच एन्ट्री घ्या

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड या मुकेश अंबानींच्या मालकीच्या वस्त्रोद्योग कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )

जर तुम्ही मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 लाख रुपये झाले असते. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114 टक्के परतावा कमवून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 31 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 या महिन्यात शेअर्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्के कमजोर झाले होते.

जानेवारी 2024 मध्ये आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 51.76 टक्के वाढली होती. 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 28 टक्क्यांनी घसरले होते. हा स्टॉक 10.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 156 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कापड उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी कापडे, पॅलेट्स, कापूस आणि मिश्रित सूत, विणलेले कापड, घरगुती कापड, पॉलिस्टर धागे आणि भरतकाम उत्पादने, तसेच शॉपिंग बॅग आणि रुमाल यासारखे उत्पादन बनवते. या कंपनीची स्थापना 1986 मध्ये साली मुंबईमध्ये झाली होती.

डिसेंबर तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला 215.5 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 241.43 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीचा महसूल 26 टक्क्यांनी घसरून 1,217 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा निव्वळ रोख प्रवाह आणि ऑपरेटिंग क्रियाकलापांमधील रोख प्रमाण वाढत आहे. ब्रोकरेज फर्मने माहिती दिली की, मागील 2 वर्षांत या कंपनीच्या निव्वळ रोख प्रवाहात सुधारणा पाहायला मिळाली आहे. मागील 4 तिमाहीत सातत्याने कंपनीच्या महसुलात घट होत आहे.

2020 साली मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज आणि JM Financial Asset Reconstruction कंपनीने आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण केले होते. आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि JM Financial Asset Reconstruction कंपनीने आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे 34.99 भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x