6 May 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, अजून एक मोठी ऑर्डर, टारगेट प्राइस जाहीर

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळने अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला 552 बसेसचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीला प्रतिसाद देत आहेत.

अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये माहिती दिली की, ‘अल्ट्रा लो एंट्री’ बसचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी केला जाणार आहे. अशोक लेलँड कंपनीने आतापर्यंत TMSTC ला 18477 बसेसचा पुरवठा केला आहे. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 171.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीने माहिती दिली की, “कंपनीला मिळालेली नवीन ऑर्डर कंपनीची अत्यंत कार्यक्षम, आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने तयार करण्याच्या समर्पणाला बळकट करतो”.

हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड या फ्लॅगशिप कंपनीने पुढील काही महिन्यांपासून बसेसचा पुरवठा सुरू करण्याची माहिती दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळू शकते.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासह तज्ञांनी स्टॉकवर 238 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. 2023 या वर्षात व्यावसायिक वाहन निर्मात्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा स्टॉक बेंचमार्क सेन्सेक्सच्या 18 टक्के वाढीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 191 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड कर होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE 22 December 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x