14 December 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

BHEL Share Price | BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीसाठी गर्दी

BHEL Share Price

BHEL Share Price | मागील काही दिवसापासून बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात 2×800 MW क्षमतेचे कोडरमा फेज-II थर्मल पॉवर स्टेशन उभारण्यासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून 10,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 52 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

31 जुलै 2024 रोजी बीएचईएल कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करतील. सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.75 टक्के वाढीसह 322.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच बीएचईएल कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 0.25 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.

अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल स्टॉकवर बाय रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 361 रुपये म्हणजेच सध्याच्या तुलनेत 16 टक्के अधिक वाढू शकतो. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.96 टक्के वाढीसह 317.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभरात हा स्टॉक 318.05 रुपये ते 310.70 रुपये दरम्यान ट्रेड करत होता. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.10 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 94.80 रुपये होती. या स्टॉकचा EPS 0.76 आहे. तर कंपनीचा P/E गुणोत्तर -419.25 आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 29 July 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x