15 December 2024 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

ideaForge Technology Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, IPO कमाई करून देईल?

ideaForge Technology Share Price

ideaForge Technology Share Price| आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO खुला करण्यापूर्वी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 255 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 पासून आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सामान्य गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या आयपीओ डिटेल

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 26 जून ते 29 जून 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 638 रुपये ते 672 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीच्या IPO मध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि इतर गुंतवणूकदार मिळून 48.69 लाख शेअर ऑफ सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. यासोबत कंपनी 240 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी करणार आहे.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी जीएमपी

शेअर बाजारातील स्टॉकब्रोकरच्या मते आयडिया फोर्ज कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 470 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा ग्रे मार्केटमधील ट्रेंड असाच सुरू राहिला तर आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1142 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजे लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळू शकतो, हे नक्की. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते टाटा ग्रुपने देखील आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. कंपनीने प्री-आयपीओ प्लेसमेंट राऊंडमध्ये 60 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने टाटा एआयजी, जनरल इन्शुरन्स, 360 वन स्पेस अपॉर्म्युनिटीज फंड सिरीज 9 आणि 10, मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड आणि थिंक इन्व्हेस्टमेंट्स पीसीसी, यांच्या माध्यमातून मोठी भांडवल उभारणी केली आहे. आयडियाफोर्ज कंपनीने आपल आयपीओमध्ये एक लॉटमध्ये 22 शेअर्स ठेवले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बातमी म्हणजे आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2023 मध्ये 192.27 कोटी रुपये मूल्याचे वर्क ऑर्डर मिळवले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ideaForge Technology Share Price today on 26 June 2023.

हॅशटॅग्स

ideaForge Technology Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x