20 May 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

IREDA Share Price | अल्पावधीत मालामाल करतोय IREDA शेअर, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?

IRDEA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरडीईए कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरडीईए कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 190.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सौर ऊर्जा निर्मितीबाबत मोठी घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरडीईए कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 195.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, भारतात 1 कोटी घरावर सोलर रूफटॉप बसवून सौर ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे लोकांना 300 युनिट मोफत वीज आणि मासिक 15 ते 18 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील मोठे निर्णय जाहीर केले आहेत. आयआरडीईए या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,823.25 कोटी रुपये आहे.

या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 30-32 रुपये निश्चित केली होती. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरडीईए कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आज या कंपनीचे शेअर्स 195 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांनी 281 टक्के परतावा कमावला आहे.

जीसीएल ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आयआरडीईए कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. GCL ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली होती.

या योजनेत देशातील 1 कोटी घरांवर सौरऊर्जा संयंत्र बसवले जाणार आहेत. यामुळे IREDA सारख्या कंपनीच्या कमाईत नक्कीच भर पडणार आहे”. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 240 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मात्र तज्ञांनी गुंतवणूक करताना लोकांना 139 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 02 February 2024.

हॅशटॅग्स

IRDEA Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x