2 May 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Multibagger IPO | लॅन्सर कंटेनर लाइन्स शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले, फ्री बोनस शेअर्ससह झाली बक्कळ कमाई

Multibagger IPO

Multibagger IPO | लॅन्सर कंटेनर लाइन्स या कंपनीचा IPO मार्च 2016 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत 12 रुपये प्रति शेअर होती. लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 10,000 शेअर्स जारी केले होते. (Lancer Container Share Price)

या SME कंपनीच्या IPO मध्ये किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 1.20 लाख जमा करावे लावले होते. लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या IPO स्टॉक 12.60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 148.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स एप्रिल 2016 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या नंतर कंपनीने आपल्या शेअर धारकांना 3 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5 शेअरवर 3 बोनस शेअर्स वाटप केले होते. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या शेअरची संख्या आता 16,000 शेअर्स झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीने पुन्हा एकदा 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

कंपनीने यात शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर दोन बोनस शेअर मोफत दिले होते. अशाप्रकारे IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या शेअरची संख्या 48,000 झाली. या नंतर लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित केले होते. त्यामुळे IPO शेअर धारकांची संख्या 96,000 वर गेली.

लॅन्सर कंटेनर लाइन्स या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 12 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. आणि IPO च्या एका लॉटमध्ये कंपनीने 10,000 शेअर्स वाटप केले होते. या नंतर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा बोनस इश्यू आणि एक वेळा स्टॉक स्प्लिट लाभ मिळवून दिला.

शेअरधारकांची शेअरची संख्या 10,000 वरून 96,000 वर गेली. लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअरची किंमत आता 148 रुपये आहे. याचा अर्थ ज्यां गुंतवणूकदारांनी लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या IPO मध्ये 1.20 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 14,208,000 रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger IPO of Lancer Container Lines share price on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x