14 December 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Multibagger Stocks | झटपट पैसा वाढवायला ऑनलाईन गर्दी, या 5 शेअर्सनी 5 दिवसात 108 टक्क्यांपर्यंत परतावा दिला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मध्यवर्ती बँकांचे महागाई धोरण, आयटी कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल, कमी होणारी महागाई यामुळे शेअर बाजार मागील आठवड्यात अर्धा टक्का वधारला होता. तथापि, आयटी कंपन्यांच्या शेअरमधील अस्थिरता आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सतत होणारी विक्री यामुळे शेअर बाजाराची वाढ मर्यादित झाली होती. मागील आठवड्यात तंत्रज्ञान, धातू, वाहन आणि निवडक बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी बाजाराला थोडीफार सावरले होते. एफएमसीजी आणि इन्फ्रा क्षेत्रातील स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.33 टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. या दरम्यान 5 कंपन्याच्या शेअर्सनी अवघ्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊन सविस्तर माहिती.

श्रीराम AMC :
श्रीराम एएमसी या स्मॉल-कॅप कंपनीचे बाजार भांडवल 129.42 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 108.97 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या शेअरची किंमत अवघ्या 5 दिवसात 100.90 रुपयांवरून 210.85 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 210.85 रुपयांवर क्लोज झाला होता. तर मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 220.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या लोकांनी पाच दिवसापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.09 लाख रुपये झाले आहे. स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे जोखमीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे चांगले.

लुहारुका मीडिया :
लुहारुका मीडिया कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचा शेअर 2.69 रुपयांवरून वाढून 4.54 रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्समधून लोकांनी 68.77 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 42.36 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात या स्टॉकने 68.77 टक्के दिलेला परतावा FD सारख्या पर्यायांपेक्षा अनेक पट जास्त आहे. आज मंगळवारी हा स्टॉक 9.86 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रेट्रो ग्रीन :
रेट्रो ग्रीन कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 67.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या पाच दिवसात शेअरची किंमत 10.20 रुपयांवरून 17.09 रुपयांवर पोहचली आहे. म्हणजेच या शेअरमधून अल्पावधीत गुंतवणूकदारांनी 67.55 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 8.25 कोटी रुपये आहे. आज मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 15.43 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जेनेरिक इंजिनिअरिंग :
जेनेरिक इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनेही मागील आठवड्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. अवघ्या पाच दिवसात या कंपनीचा शेअरची किंमत 34 रुपयांवरून 53.90 रुपयांवर पोहोचली आहे. या शेअरमधून अल्पावधीत गुंतवणूकदारांनी 58.53 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 227.55 कोटी रुपये आहे. मंगळवारी कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 59 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

फर्स्ट फिनटेक :
फर्स्ट फिनटेक कंपनीच्या शेअर्सनेही मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. अवघ्या पाच दिवसात हा स्टॉक 4.81 रुपयांवरून 7 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 43.53 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 7.28 कोटी रुपये आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 6.99 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks given return up to 100 percent in last 5 trading sessions check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x