2 May 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

Stock To Buy | या शेअरवर BUY रेटिंग, बोनस शेअर्स आणि लाभांश असा डबल फायदा मिळेल, संधीचे सोने करणार का?

Stock To Buy

Stock To Buy | आयसीआयसीआय डायरेक्टने निओजेन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची पक्ष किंमत 1,680 रुपये निश्चित केली आहे. सध्या हा स्टॉक 1,398 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक पुढील काळात 1680 रुपयांची लक्ष्य किंमत स्पर्श करण्यात यशस्वी झाला तर गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांहून जास्त नफा मिळेल. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुम्हाला 6 लाख रुपये परतावा मिळाला असता.

निओजेन केमिकल्स बद्दल थोडक्यात :
निओजेन केमिकल्स ही एक स्मॉल कॅप स्टॉक कंपनी असून केमिकल सेक्टरशी संबंधित उद्योग व्यवसाय करते. 1991 साली स्थापन झालेली निओजेन केमिकल्स कंपनी विशेष सेंद्रिय ब्रोमिन-आधारित रासायनिक संयुगे तसेच विशेष अजैविक लिथियम-आधारित रासायनिक संयुगे बनवण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे.

कंपनीची उत्पादने आणि व्यवसाय :
कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये मुख्यतः फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्स, अॅग्रोकेमिकल इंटरमीडिएट्स, इंजिनिअरिंग फ्लुइड्स, पॉलिमर अॅडिटीव्ह आणि वॉटर ट्रीटमेंट केमिकल्स यांचा समावेश होतो. निओजेन कंपनी मध्ये दोन विभाग कार्यरत आहेत. पहिला आहे, सेंद्रिय रसायनशास्त्र. आणि दुसरा आहे, अजैविक रसायनशास्त्र. या कंपनी 80 टक्के उत्पन्न सेंद्रिय रसायनांमधून कमवते, आणि उरलेले उत्पन्न अजैविक रसायनातून कमवते.

कंपनीचे तिमाही निकाल :
जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 31 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे एकूण मार्जिन 3.45 टक्क्यांनी वाढले असून 46.8 टक्क्यांवर गेले आहे. कंपनीचा एबिटा मार्जिन प्रमाण 1.78 टक्क्यांच्या टक्क्यांच्या घसरणीसह 16.7 टक्क्यांवर आला आहे. कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांची घट झाली असून नफा 9.9 कोटी रुपयांवर आला आहे.

सुरू झाल्यापासून दिलेला एकूण परतावा :
या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना कंपनी सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत 433.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, या काळात जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणुक आतापर्यंत कायम ठेवली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.43 लाखांच्या वर गेले असते. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरने मागील एक वर्षात 9.06 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 2022 या चालू वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 16.21 टक्के घट पाहायला मिळाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 3,487.89 कोटी रुपये आहे.

शेअरची उच्चांक किंमत पातळी :
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,933.70 रुपये आहे. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 1223.80 रुपये होती. या कंपनीच्या स्टॉकने मागील तीन वर्षांत 55.7 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. सेंद्रिय आणि अजैविक अशा दोन्ही विभागातील चांगल्या वाढीच्या दृष्टीकोनाचा विचार करून ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

बोनस शेअर बद्दल :
ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने ही आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून ती वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतलेली आहे. 7 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:1 प्रमाणात बोनस शेअर्स आणि अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 922 कोटी रुपये आहे. कंपनीने लाभांश वितरण करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. आता जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्ही प्रति शेअर 50 रुपये लाभांश आणि 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स इश्यूसाठी पात्र व्हाल. असाल. 1:1 प्रमाणे कंपनी तुम्हाला एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत देईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Neogen Chemicals Ltd Stock To Buy recommended by stock market expert and brokerage firm on 10 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x