16 December 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर्समध्ये घसरण पाहून गुंतवणुकदार चिंतित, स्टॉकमधील पडझडीचे कारण काय?

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या कमजोरीसह ट्रेड करत होते. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे, एक मोठी ब्लॉक डील होती. स्टॉक एक्सचेंजेसवर उपलब्ध माहितीनुसार, या ब्लॉक डीलमध्ये पेटीएम कंपनीचे 1,441 कोटी रुपये मूल्याचे 1.6 कोटी शेअर्स ट्रेड झाले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण भाग भांडवालाच्या 2.6 टक्के होते. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 3.08 टक्के घसरणीसह 895.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील एका वर्षात पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट केले आहेत. पेटीएम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 920 रुपये ओपनिंग किमतीवर पोहोचल्यानंतर 877.15 रुपये किमतीपर्यंत घसरले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 69 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. रिझव्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहक कर्जासाठीचे नियम कडक केल्यानंतर पेटीएम कंपनीच्या शेअरवर सर्व गुंतवणुकदरांचे लक्ष केंद्रीत झाले आहेत.

आरबीआयने बँका आणि एनबीएफसींना उच्च भांडवली बफर बाजूला ठेवण्यास सांगितले होते, या निर्णयामुळे पेटीएम सारख्या फिनटेक कंपनीच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते RBI ने नियम कडक केल्याने आणि बँकांचे व्याजदर वाढल्याने पेटीएम कंपनीच्या कमाईवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पेटीएम कंपनीचे शेअर्स एमएससीआय ग्लोबल बेंचमार्क इंडेक्समध्ये सामील केले जाण्याची शक्यता आहे.

IIFL अल्टरनेटिव्ह रिसर्च फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे, की पेटीएम स्टॉकमध्ये 140 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. तर नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पेटीएम स्टॉकमध्ये 162 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक होऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x