15 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Penny Stock | या पेनी स्टॉकने 1641 टक्के परतावा दिला, कोटीपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या स्टॉकची डिटेल सेव्ह करा

Penny Stock

Penny Stock | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसा अखेर शेअर बाजार लाल निशाणी वर बंद झाला होता. 60,613.70 ट्रेड करणाऱ्या सेन्सेक्समध्ये 419.85 अंकांची म्हणजेच 0.69 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. 18,028.20 वर ट्रेड करणाऱ्या निफ्टीमध्ये 128.80 अंकांची म्हणजेच 0.71 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1231 शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर 2127 शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. 127 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम आणि टायटन कंपनी निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात ट्रेड करणारे स्टॉक होते. तर हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल आणि ओएनजीसी हे स्टॉक जबरदस्त वाढीसह ट्रेड करत होते. मेटल, ऑटो आणि पीएसयू बँका या सेक्टरमध्ये 1-2 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी 1-1 टक्क्यांची घसरण झाली होती. पण शेअर बाजारात अल्पकालीन ट्रेडिंग करण्याएवजी दीर्घकालीन गुंतवणूक करणे खूप फायद्याचे आहे. आज आपण या लेखात अशा एका स्टॉकची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. चला तर मग अधिक तपशील जाणून घेऊ.

लॅन्सर कंटेनर लाइन्स :
एप्रिल 2016 मध्ये हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्या दिवशी जा स्टॉक 2.63 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या या स्टॉकची किंमत 480.10 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या कालावधीत या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी 18,154.75 टक्के परतावा कमावला आहे. सुरुवातीच्या काळात ज्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये 55000 रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1 कोटी रुपये झाले आहे.

5 वर्षांचा परतावा :
Lancer Container Lines कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या स्टॉकने मागील 5 वर्षात 1641.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 17.41 लाख रुपये झाले आहे. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे 16 पट अधिक वाढले आहे. 2022 या वर्षात या स्टॉकने आतापर्यंत 166.72 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एका वर्षात कंपनीने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.66 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.

लोकांचा पैसा 1 वर्षात तिप्पट :
Lancer Container Lines कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 208.55 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 3.08 लाख रुपये झाले आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 137 टक्के परतावा मिळवून दिला आहे. फक्त 6 महिन्यांत 1 लाख गुंतवणुकीवर 2.37 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप सध्या 1,447.08 कोटी रुपये आहे.

52 आठवड्यांची वाढ आणि घट :
Lancer Container Lines कंपनीच्या स्टॉकची मागील 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 508 रुपये आहे. तर या स्टॉकची सर्वात नीचांक किंमत पातळी 152 रुपये होती. एक महिन्यात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना परतावा 33.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 10.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आज हा स्टॉक 1.10 टक्क्यांच्या कमजोरीसह 480.10 रुपयांवर ट्रेड करत होता.

कंपनी बद्दल थोडक्यात :
Lancer Container Lines Limited कंपनी जगातील विविध देशांत आणि खंडात जसे की आशिया, आफ्रिका, LATAM (लॅटिन अमेरिका), CIS देशांमध्ये लाइनर /NVOC सेवा प्रदान करणारी एक शिपिंग एजन्सी आहे. ही कंपनी प्रकल्प आणि मालवाहतूक अग्रेषण, कंटेनर व्यापार आणि अग्रगण्य अशा शिपिंग आणि शिपिंग संबंधित सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये अग्रणी मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Lancer Container Lines share price return on investment on 11 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x