14 December 2024 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stocks | मालामाल करणारे चिल्लर भावातील पेनी शेअर्स रोज अप्पर सर्किटवर आदळत आहेत, लिस्ट सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारतीय शेअर बाजार हिरव्या निशाणीवर सुरू झाला होता. त्यानंतर शेअर बाजारात सेन्सेक्स इंडेक्स 30 अंकांच्या वाढीसह 66,713 वर ट्रेड करत होता. तर NSE निफ्टीमध्ये 18 अंकांच्या वाढीसह 19633 वर ट्रेड करत होता. यानंतर मागील 2 दिवसापासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत.

सध्या भारतीय शेअर बाजार उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. अशा काळात अनेक कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी BSE सेन्सेक्स 0.66 टक्के घसरणीसह 66266.82 अंकावर क्लोज झाला आहे. तर निफ्टी इंडेक्स 0.60 टक्के घसरणीसह 19659.90 अंकावर क्लोज झाला आहे.

भारतीय शेअर बाजारातील निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी रिअॅलिटी आणि निफ्टी ऑटोमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी एनर्जी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फार्मामध्ये विक्रीच्या दबाव पाहायला मिळाली होती. लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा आणि इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायली मिळाली होती. आणि यातून गुंतवणूकदारांनी भरपूर फायदा कमावला आहे. तर याउलट कोटक बँक, रिलायन्स आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2000 कोटी रुपये गुंतवणूक काढून घेतली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 1290 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

पेनी शेअर्स – अप्पर सर्किटमध्ये

चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काही शेअर्स 10 ते 15 टक्के अपर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंट्री कॉन्डोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर कंट्री कॉन्डोस कंपनीच्या शेअरची किंमत 4.78 रूपये किमतीवर पोहचली होती. High Street Network Limited कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सब इव्हेंट्स आणि गव्हर्नन्स नाऊ मीडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स देखील 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यासह श्री राजस्थान सिंटेक्स लिमिटेड, किरण सिंटेक्स लिमिटेड, आश्रम ऑनलाइन आणि वसुधा गामा एंटरप्रायझेस या कंपन्याचे शेअर्स देखील 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 27 July 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x