19 April 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Personal Loan | पर्सनल लोन मिळवण्यासाठी पात्रता काय? | व्याजदर कोणत्या घटकांवर अवलंबून असतात पहा

Personal Loan

Personal Loan | आर्थिक संकटाच्या काळात पाठिंबा देण्यासाठी पर्सनल लोनची मोठी भूमिका असते. हे असे कर्ज आहे ज्यासाठी बऱ्याच खूप मोठ्या मालमत्ता गहाण ठेवण्याची किंवा हमी म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही. बँक काही गोष्टी आणि कर्जाची परतफेड करण्याची तुमची क्षमता पाहून कर्ज देते. मात्र, वैयक्तिक कर्जासाठी काही आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता असणे आवश्यक असते. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कर्जासाठी एकूण काय आवश्यक आहे.

पर्सनल लोनच्या पात्रतेच्या अटी :
वय :
अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असावे

क्रेडिट स्कोर :
750 किंवा त्याहून अधिक

पगार :
नोकरदार लोकांचा किमान पगार दरमहा 15000 रुपये असावा.

स्थिर रोजगार:
कामाचा एकूण अनुभव २ वर्षांचा असून त्यातील १ वर्ष एकाच व्यवसायात आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती किमान २ वर्षे एकाच व्यवसायात असाव्यात.

नोकरीला कुठे :
नामांकित संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, खासगी व पब्लिक लिमिटेड कंपन्या, सरकारी संस्था, पीएसयू या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती.

पर्सनल लोनचे व्याजदर जास्त आहेत. विविध बँकांचे व्याजदरही वेगवेगळे आहेत. अनेकदा पर्सनल लोनचे व्याज अनेक घटकांवर अवलंबून असते. कदाचित तीच बँक वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देते. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की बँक कोणत्या घटकांच्या आधारे पर्सनल लोनचे व्याजदर ठरवते:

आपला क्रेडिट स्कोअर :
क्रेडिट स्कोअरवरून त्या व्यक्तीला पर्सनल लोन देण्यात किती रिस्क असते हे कळतं. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर अधिक जोखीम घेतल्यामुळे बँक कर्जाला जास्त व्याजदरही लागू करेल. त्यामुळे ७५० किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर कायम ठेवण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.

आपले मासिक उत्पन्न :
ज्या अर्जदाराचे उत्पन्न जास्त आहे, तो वेळेवर कर्ज भरू शकेल, असा बँकांना विश्वास आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांना पर्सनल लोन लवकर आणि कमी दरात मिळतं.

कोठे काम करावे :
पर्सनल लोनचे व्याजदर ठरवताना तुम्ही कुठे काम करता आणि काय काम करता याकडेही लक्ष द्या. नामांकित संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना तुलनेने लवकर आणि चांगल्या व्याजदराने कर्ज मिळते. जे लोक सरकारी नोकरी करतात त्यांना नोकरीच्या सुरक्षिततेमुळे चांगल्या व्याजदराने वैयक्तिक कर्जही मिळते.

तुमचे बँकेशी असलेले चांगले संबंध :
तुमचे बँकेशी चांगले-जुने संबंध असतील आणि तुम्ही यापूर्वी वेळेवर कर्ज भरले असेल तर बँक तुम्हाला इतरांपेक्षा सुलभ अटींवर आणि कमी व्याजदरावर कर्ज देऊ शकते. बँकेच्या विद्यमान ग्राहकांना प्री-अप्रूव्ह्ड लोन ऑफरही मिळू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Personal Loan eligibility check details 05 June 2022.

हॅशटॅग्स

#Personal Loan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x