14 December 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

Sakar Healthcare Share Price | बापरे! सकार हेल्थकेअर शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, अप्पर सर्किटवर आदळणार शेअर खरेदी करावा?

Sakar Healthcare Share Price

Sakar Healthcare Share Price |  शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकार हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 297.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 324.65 रुपये किमतीवर पोहचला होता. एका दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. सकार हेल्थकेअर कंपनीच्या शेअरची सुरुवात 50 रुपये प्रति शेअर किंमत पातळीवरून झाली होती.

अवघ्या तीन वर्षात हा स्टॉक आता 324.65 रुपये किमतीवर पोहचला आहे. नुकताच सकार हेल्थकेअर कंपनीने प्रेफरेंशियल शेअर्स इश्यू केले होते. त्यात टाटा हेल्थकेअर म्युचुअल फंडने तब्बल 10.8 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. ही बातमी शेअर बाजारात कळताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 324.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सकार हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स अशा काही स्टॉकपैकी आहेत, ज्यानी कोविडनंतरच्या रिकव्हरीदरम्यान जबरदस्त तेजी साध्य केली होती. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला सकार हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 234.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 ऑगस्ट 2023 पर्यंत हा स्टॉक 254.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र अचानक शुक्रवारी स्टॉकमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला आणि, स्टॉक 324.65 रुपये किमतीवर पोहचला.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 27.34 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा कंपनीच्या शेअरची किंमत 62.69 टक्के वाढली आहे.

सकार हेल्थकेअर कंपनीने प्रेफरंस इश्यू अंतर्गत 23 लाख इक्विटी शेअर्स 259.75 रुपये किमतीवर वाटप करून 60 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय सेबीला कळवला आहे. प्रेफरंस इशु अंतर्गत टाटा कॅपिटल म्युचुअल फंडने सकार हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 10.82 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. सकार हेल्थकेअर मध्ये गुंतवणूक करताना टाटा हेल्थकेअर फंडाने माहिती दिली की, संचालक मंडळाने या कंपनीच्या प्रेफरंस ऑफरमध्ये गुंतवणूक करून 10.82 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sakar Healthcare Share Price today on 5 August 2023

हॅशटॅग्स

Sakar Healthcare Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x