14 December 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार
x

Servotech Share Price | शेअरची किंमत 100 रुपये! 5 दिवसांत दिला 27 टक्के परतावा, शेअर पुढेही आहे फायद्याचा

Servotech Share Price

Servotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 121 अंकांच्या वाढीसह 72205 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 68 अंकांच्या वाढीसह 21,922 अंकांवर ट्रेड करत होता. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी असताना सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 4.56 टक्क्यांच्या वाढीसह 104.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी भारतातील ईव्ही चार्जिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने देशात ईव्ही चार्जिंग सेटअप सेट करण्यासाठी अनेक आघाडीच्या कंपन्यासोबत मोठे करार केले आहेत. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.29 टक्के घसरणीसह 100.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सर्वोटेक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 108.70 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2270 कोटी रुपये आहे. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 16.48 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 600 टक्के वाढले आहेत. मागील 5 दिवसांत सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 420 टक्के वाढून 108 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. 31 मार्च 2023 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर 18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 500 टक्के वाढले आहेत.

1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतात ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. या बातमीमुळे सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने मजबूत उसळी घेतली. नुकताच सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 120 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत सर्वोटेक पॉवर कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीसाठी 1800 डीसी फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करणार आहे.

भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीने चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात 60 किलोवॅट आणि 120 किलोवॅट क्षमतेचे दोन चार्जर व्हेरियंट स्थापन केले जाणार आहेत. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी 2024 या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण करेल. यापूर्वी देखील सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीने भारतात 4000 ईव्ही चार्जर स्टेशन स्थापन केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x