12 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Stock in Focus | झुनझुनवालांचा प्रिय स्टॉक 1 महिन्यात 32 टक्के वधारला, स्टॉक टार्गेट प्राईस 120 रुपये, खरेदी करणार?

Stock in Focus

Stock in Focus| चालू आठवड्यात पहिल्या दोन दिवसात शेअर बाजारात जबरदस्त मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. या तेजीचा फायदा उचलण्यास अनेक गुंतवणूकदार यशस्वी ठरले आहेत. दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या एका शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. या स्टॉकचे नाव आहे, “करूर व्यासा बँक “. या बँकेच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर गेली आहे. करूर व्यासा बँकेच्या शेअर्समध्ये सध्या जबरदस्त तेजी आली आहे.

1 वर्षात दिला 100 टक्केपेक्षा जास्त परतावा :
राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीच्या स्टॉकने मागील वर्षभरात आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 114 टक्क्यांची अप्रतिम वाढ झालं आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 48.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या स्टॉकची किंमत 104 रुपयांच्या वर पोहोचली आहे. या कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 104 रुपये आहे. 2022 च्या सुरूवातीला ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 125 टक्क्यांनी वाढले आहे. शेअर्सच्या मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की,या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 115 टक्क्यांची वाढ झाली आहे. करूर व्यासा बँकेच्या स्टॉकने मागील 1 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 32 टक्क्यांहून जास्त नफा कमवून दिला आहे.

प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म MK ग्लोबलने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात करूर व्यासा बँकेच्या शेअरची किंमत 125 रुपयांची किंमत स्पर्श करू शकते. जर हे मूल्यांकन योग्य ठरले तर कंपनीच्या शेअर्समध्ये भरमसाठ वाढ होईल आणि, गुंतवणुकदारांना मजबूत नफा मिळेल.

तिमाही निकालांनी आश्चर्यचकीत केले :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत करूर व्यासा बँकेने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. कंपनीचे तिमाही निकाल सकारात्मक येण्याचे संकेत मिळत आहे. सप्टेंबर तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 52 टक्क्यांची वाढ झाली असून निव्वळ नफा 250 कोटी रुपयांवर गेला आहे. शेअर्सच्या किमती वाढण्यामागे सकारात्मक त्रैमासिक निकाल आणि जबरदस्त कामगिरी हे प्रमुख कारण आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock in Focus of Karur Vyasa Bank share price return on investment on 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x