20 May 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये टेक्निकल चार्टवर बुलीश कँडल तयार, पुढची टारगेट प्राईस किती?

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्क्यांच्या वाढीसह 1152.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.

टेक्निकल चार्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1152 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आज हा स्टॉक या प्रतिकार किमतीच्या किंचित खाली घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.29 टक्के घसरणीसह 1,151 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1152 रुपये ही खूप महत्त्वाची पातळी आहे. टाटा टेक कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी या कंपनीच्या शेअर्सने 1400 रुपये किंमत स्पर्श केली होती. 04 डिसेंबर 2023 नंतर हा स्टॉक पुन्हा 1152 रुपये किमतीवरून 1285 रुपये किमतीवर गेला होता. 30 जानेवारी 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1152 रुपयेवरून 1070 रुपये किमतीवर आला होता. आता टाटा टेक स्टॉक पुन्हा 1152 रुपये किमतीवर आला आहे.

दैनिक टेक्निकल चार्टवर टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ‘W’ पॅटर्न तयार करून मजबूत ब्रेकआउटचे संकेत देत आहेत. दैनंदिन चार्टवर, टाटा टेक स्टॉकने 5 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान 12 ट्रेडिंग सेशनमध्ये W पॅटर्न तयार केला आहे. याकाळात टाटा टेक स्टॉकने मजबूत ट्रेंड लाइनमधून ब्रेकआऊट दाखवला आहे. सध्या टाटा टेक स्टॉकमध्ये 1117 रुपये किमतीवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट सक्रिय झाला आहे.

टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकमध्ये ब्रेकआउट झाला तर हा स्टॉक जबरदस्त कमाई करून देऊ शकतो. टाटा टेक स्टॉकमध्ये पहिली टार्गेट प्राईस 1215 रुपये असेल. तर दुसरी टार्गेट प्राईस 1265 रुपये असेल. आता टाटा टेक स्टॉकच्या दैनिक चार्टवर बुलिश कँडल तयार होत आहेत. त्यामुळे या स्टॉकचा फॉलोअप घेणे आवश्यक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 22 February 2024.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x