20 May 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज
x

Titagarh Rail Share Price | केवळ RVNL शेअर नव्हे! हा रेल संबंधित शेअर सुद्धा तुफान वेगात परतावा देतोय, स्टॉक डिटेल्स नोट करा

Titagarh Rail Share Price

Titagarh Rail Share Price | टीटागढ रेल सिस्टीम या भारतीय रेल्वेशी संबंधित व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 1 एप्रिल 2023 पासून टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. या काळात शेअरची किंमत तब्बल 149 टक्के वाढली आहे. 2023-24 या चालू आर्थिक वर्षात टीटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

याच तीन महिन्याच्या कालावधीत बीएसई सेन्सेक्समध्ये फक्त 11 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के वाढीसह 669.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स मजबूत ऑर्डर बुक आउटलुक आणि भारत सरकारच्या पायाभूत विकास योजनांमुळे सुसाट तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टीटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी बराच काळ टिकून राहणार आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारतीय रेल्वे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामाला सुरुवात झाली आहे. भारत सरकारने पायाभूत विकास कामावर मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च गुंतवणुक वाढवली आहे.

रेल्वे क्षेत्रात कार्यरत कंपन्याना विविध विकासकामांचे ऑर्डर मिळत आहे. टीटागढ रेल सिस्टीम कंपनीला देखील मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 659.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या स्टॉकने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 41.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत टीटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41.16 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 30 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 34.34 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Titagarh Rail Share Price today on 10 August 2023

हॅशटॅग्स

Titagarh Rail Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x